Mumbai Crime Branch चे महत्त्व वाढणार; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती?

मागील काही वर्षामध्ये मुंबई क्राईम ब्रँचमध्ये खूप मोठे बदल करून क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) अधिकारी यांची त्या पदावरून उचलबांगडी करून त्यांची बदली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली, तसेच मुंबई क्राईम ब्रँच अधिकार काढून घेण्यात आले आणि क्राईम ब्रँचच्या युनिटला नवखे अधिकारी आणून बसविण्यात आले.

149
मुंबई क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) नव्याने उभारी देण्यासाठी क्राईम ब्रँचच्या युनिट प्रमुखपदावर प्रभारी पोलीस निरीक्षकाऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलात नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये अनेक वरीष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांची मुंबई क्राईम ब्रँचमध्ये बदली करण्यात आलेल्या आहेत. लवकरच क्राईम ब्रँचमध्ये  मोठा बदल करण्यात येणार असून प्रत्येक युनिटमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी युनिट प्रमुख असतील, अशी  माहिती  पोलीस दलातील अधिकारी दर्जाच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई ‘क्राईम ब्रँच’ (गुन्हे शाखा) (Mumbai Crime Branch) हा एकेकाळी मुंबई पोलीस दलाचा कणा मानला जात होता. गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचच्या नावानेच भल्याभल्या गुंडांची चड्डी पिवळी होत होती. मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम करणाऱ्यांना संधी मिळावी यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकारी धडपड करीत होते. मात्र मागील काही वर्षांपासून मुंबई क्राईम ब्रँचला लागलेली घरघर बघून मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम करण्यासाठी पोलीस अधिकारी उत्सुक नसतात. मुंबई पोलीस दलातीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यानी मुंबई  क्राईम ब्रँच संपवल्याची चर्चा मुंबई पोलीस दलात दबक्या आवाजात अधिकारी करताना दिसत आहे. परंतु आता मुंबई क्राईम ब्रँचला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच प्रयत्न सुरू आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिटमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षकाऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्यांची युनिट प्रमुख निवड करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचमध्ये १२ युनिट आणि ३ विशेष युनिट

मुंबई पोलिस दलाचा भाग असणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचच्या (गुन्हे शाखा) (Mumbai Crime Branch) मुंबईत १२ युनिट आणि ३ विशेष युनिट आहे. त्याच बरोबर मागील दोन वर्षात सायबर गुन्हे शाखेचे पाच वेगळे युनिट  करण्यात आले असून या सर्व युनिटसाठी १ सहपोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी आणि तीन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या बारा युनिट आणि ३ विशेष युनिटला पूर्वी युनिट प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी यांची निवड केली जात होती. एका युनिटचकडे जवळपास सात ते आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबाबबदारी असते. ८०च्या दशकापासून अगदी २०१० सालापर्यंत मुंबई क्राईम ब्रँचची गुन्हेगारी जगतात दहशत होती. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या तसेच गुन्हेगारी संपुष्टात आणून अगदी क्लीस्ट गुन्ह्याची उकल करण्यात क्राईम ब्रँचचा हातखंडा होता.

क्राईम ब्रँचला नवीन उभारी

मागील काही वर्षामध्ये मुंबई क्राईम ब्रँचमध्ये खूप मोठे बदल करून क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) अधिकारी यांची त्या पदावरून उचलबांगडी करून त्यांची बदली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली, तसेच मुंबई क्राईम ब्रँच अधिकार काढून घेण्यात आले आणि क्राईम ब्रँचच्या युनिटला नवखे अधिकारी आणून बसविण्यात आले. क्राईम ब्रँच युनिटमध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी युनिट प्रमुख (प्रभारी) काम पहातात. मागील अनेक वर्षांपासून पाठी मागे राहिलेल्या क्राईम ब्रँचला उभारी देण्यासाठी प्रत्येक युनिटमध्ये युनिट प्रमुख पदावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक केवळ पोलीस ठाण्यामध्ये दिसत होते, परंतु यापुढे मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिटमध्ये युनिट प्रमुख म्हणून वरिष्ठ पोलिस  निरिक्षक यांना बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली आहे.

बदल्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना क्राईम ब्रँच दाखवले

काही आठवड्यापूर्वी मुंबई पोलीस दलात झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदल्यामध्ये अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना बदलीचे ठिकाण क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) दाखविण्यात आलेले असले तरी अद्याप त्यांची नियुक्ती क्राईम ब्रँच युनिटला करण्यात आलेली नाही. गणपती नंतर लवकरच मुंबई क्राईम ब्रँचमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून मुंबईतील क्राईम ब्रँचच्या युनिटप्रमुख म्हणून वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांची बदली करण्यात येणार आहे.

प्रभारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यातील फरक काय?

प्रभारी हा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा त्या पोलीस निरीक्षकाला काही वर्षे वरिष्ठ असतो, पोलीस निरीक्षक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यत येण्यासाठी जवळपास ८ ते ९ वर्षाचा कालावधी लागतो, त्यामुळे त्या अधिकाऱ्याकडे या अनुभव देखील जास्त असल्यामुळे त्याचा दर्जा पोलीस निरीक्षका पेक्षा अधिक असतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.