Mumbai Crime : रस्त्यावर थुंकल्याचा दंड ४० हजार, तोतया पोलीस अधिकारी जाळ्यात

70
Mumbai Crime : रस्त्यावर थुंकल्याचा दंड ४० हजार, तोतया पोलीस अधिकारी जाळ्यात
Mumbai Crime : रस्त्यावर थुंकल्याचा दंड ४० हजार, तोतया पोलीस अधिकारी जाळ्यात

ठाण्यात राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीकडून रस्त्यावर थुंकल्याचा दंड म्हणून ४० हजार रुपये वसूल केल्या प्रकरणी एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला भांडुप (Bhandup) येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलीस बनून लोकांची लूटमार करीत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा – National Science Day साजरा करण्याचं “हे” आहे महत्त्वाचं कारण, जाणून घ्या)

रवी पांडे (Ravi Pandey) (२८) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रवी पांडे (Ravi Pandey) हा भांडुप पश्चिम येथे राहण्यास आहे. २५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात राहणारे ५८ वर्षीय वसंत मोहिते (Vasant Mohite) हे मोटारसायकलने ऐरोली येथून मुलुंड मार्गे ठाण्याकडे जात असताना मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग येथे थांबले आणि तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकले, त्याच दरम्यान बुलेट एनफिल्ड मोटारसायकल त्यांच्याजवळ येऊन थांबली, मोटारसायकल वरून खाकी पॅन्ट काळ्या रंगाचे बूट घातलेला व्यक्ती उतरला आणि त्याने मोहिते (Vasant Mohite) यांची कॉलर पकडून स्वतःला नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा पोलीस अधिकारी असल्याची ओळख करून देत रस्त्यावर थुंकणे गुन्हा आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगून मोहिते यांना बुलेट वर बसायला सांगून पोलीस ठाण्यात जावे लागेल असे सांगून मुलुंड गोरेगांव रोड येथे घेऊन आला, आणि त्याने मोहिते यांनी ६८ हजार दंड भरण्यास सांगितले. (Mumbai Crime)

(हेही वाचा – राहुल गांधी, उद्धव ठाकरे स्वतःला हिंदू म्हणतात, पण महाकुंभला गेले नाहीत; Ramdas Athawale यांनी काय सुनावले?)

घाबरलेल्या मोहिते (Vasant Mohite) यांनी जवळच्या एका एटीएम मधून ४० हजार रुपयांची रोकड काढून त्या व्यक्तीला देऊन सुटका करून घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घडलेला प्रकार एका मित्राला सांगितला असता त्यांची फसवणूक झाल्याचे मित्राने सांगितले. मोहिते यांनी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दिलेल्या वर्णनावरून, आरोपी काळे बूट, खाकी पॅन्ट आणि राखाडी-निळा शर्ट घालून काळ्या रॉयल एनफील्ड (Royal Enfield) बुलेटवर बसला होता असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. नवघर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा माग काढला असता आरोपी हा भांडुप पश्चिम येथे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भांडुप येथून रवी पांडे (Ravi Pandey) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.