राज्यातील तरुणी बेपत्ता होत असल्याच्या प्रकरणांत वाढ झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता मुंबईतूनही अशीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे एक हजार १५७ गुन्हे दाखल झाले होते. यंदा केवळ ५ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ४४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Raj Thackeray: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना घेरलं)
प्रेम प्रकरणातून पसार होत असल्याचे उघड
अपहरणाच्या घटनांबरोबरच यातील बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून पसार होत आहेत. तर, काहींना फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. तर, काही प्रकरणांत क्षुल्लक कारणांमुळे घर सोडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, असे तपासातून दिसून येत आहे. जूनमध्ये घडलेल्या घटनेत वडील ओरडतात म्हणून अंधेरीतून भावंडांसह बेपत्ता झालेल्या चार भावंडांना मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले.
गेल्या वर्षी हजारो मुली गायब -गेल्या वर्षभरात एक हजार १५७ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी एक हजार ८७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हजारो मुली बेपत्ता झाल्या. पोलिसांकडून महिलांसंबंधित गुन्ह्यांचा तत्काळ शोध घेण्यात येतो. तर, उर्वरित ७० गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community