Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक

72
Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक
Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक
पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे १० दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ९ वर्षाच्या मुलाचा एका कारखान्याच्या छतावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुलाची हत्या करण्यात आली असून सांताक्रूझ पोलिसांनी बिहार येथून ३१ वर्षीय मारेकऱ्याला अटक केली आहे. मुलावर लैगिंग अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला असून मुलाने विरोध केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिली आहे. (Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ वर्षांचा बळीत मुलगा  ७ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथून आईसोबत छठ पूजा करून घरी परतत असताना अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी मुलाचा परिसरात शोध घेतला मात्र मुलगा कुठेच मिळून न आल्याने अखेर घाबरलेल्या कुटूंबियांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सांताक्रूझ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला. (Mumbai Crime)
मुलाचा शोध शसुरू असताना तीन दिवसांनंतर, काही स्थानिकांनी सांताक्रूझ (पश्चिम) येथील कारखान्याच्या छतावरून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. पोलिसांना तात्काळ कारखान्यात धाव घेतली असता कारखाना बंद होता, पोलिसांनी कारखाना उघडला असता त्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला, मुलाच्या कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता ७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह असल्याचे समोर आले.
परिमंडळाचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ज्योती हिबरे आणि रणजित आंधळे ,सुयोग अमृतकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजने त्यांना महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेऊन फुटेज तपासण्यात आले असता  एका फुटेज मध्ये आरोपी मुलाला घेऊन जाताना आढळून आला. (Mumbai Crime)
अधिक चौकशीत तो बिहारमधील मधुबनी येथील आपल्या गावी पळून गेल्याचे समोर आले.  सांताक्रूझ पोलिसांचे एक पथक बिहारला गेले, जिथे त्यांनी मधुबनीमध्ये शोध घेतला. अनेक तासांच्या देखरेखीनंतर त्यांनी आरोपीला पकडले. त्याला मुंबईत परत आणून स्थानिक न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी सुनावली. (Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलाला एका कपड्याच्या कारखान्यात नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मुलाने विरोध करताच त्याने मुलाची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह कारखण्याच्या छतावर फेकून दिला अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली.  आरोपी मूळचा बिहार येथे राहणारा आहे, तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच बळीत मुलगा हा सांताक्रूझ येथे आईवडील आणि भावंडासोबत राहण्यास होता. वडील रिक्षा चालक असून आई गृहनी आहे. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.