धारावीत लव्ह जिहाद! पत्नी गोमांस खात नाही म्हणून केली हत्या

मध्यप्रदेशातील हिंदू कुटुंबातील एका विवाहितेचा धारावीत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीची हत्या करून तिला फासावर लटकविण्यात आल्याचा आरोप पीडित विवाहितेच्या कुटुंबांने केला असून हा ‘लव्ह जिहाद’ चा प्रकार असल्याच्या आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. धारावी पोलिसांनी पीडित विवाहितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी सांगितले.
रेहान खान (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत महिलेचे माहेरचे नाव यशोधरा खाटीक (२४) असे असून सासरचे नाव रुबीना खान असे आहे. यशोधरा उर्फ रुबीना ही मूळची मध्यप्रदेश राज्यातील आहे. २०१९ मध्ये रेहान खान याने यशोधरा हिला पळवून मुंबईत आणून तिच्यासोबत मुस्लिम धर्माप्रमाणे विवाह केला. त्यानंतर तो धारावीत राहत होता. लग्नानंतर रेहान याने यशोधराचे बळजबरीने धर्मांतर करून तिचे नाव बदलून रुबीना असे ठेवले होते, असा आरोप यशोधरा उर्फ रुबीना हिच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. रेहान हा मोलमजुरी करून उदारनिर्वाह करत होता, या दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा दोन वर्षांचा तर दुसरा ४ महिन्यांचा आहे.
५ जानेवारी रोजी रुबीना उर्फ यशोधरा ही राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळली होती. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथे पाठला होता. या घटनेची माहिती रुबीना उर्फ यशोधरा हिच्या कुटुंबियांना पोलिसांना दिली असता तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती रेहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात रेहान हा माझ्या मुलीला बळजबरीने फूस लावून पळवून मुंबईत घेऊन आला आणि त्याने तिचे बळजबरीने धर्मांतरण करून, तिच्यावर  गोमांस खाण्यासाठी बळजबरी करीत होता, दारू पिऊन त्याने तिला या कारणावरून मारहाणदेखील केली होती. हे स्वतः मुलीने मोठा मुलगा सतीश याला फोन करून सांगितले होते, असे रुबीना उर्फ यशोधरा हिचे वडील चंद्रभान खाटीक यांनी जबाबात म्हटले आहे.
वडिलांच्या जबाबवरून रेहान याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून रेहानला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कंदळगावकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here