वडाळा येथील महर्षी कर्वे उद्यानातील (Maharshi Karve Garden in Wadala) पाण्याच्या टाकीत पडल्याने झालेल्या दोन भावंडांच्या मृत्यूप्रकरणी माटुंगा पोलिसांनी सुपरवायझरविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. वडाळा सुभाष नगर येथे राहणारे अंकुश (५) आणि अर्जुन (४) ही दोन भावंडे रविवारी हरवली होती. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या दोघांचा शोध घेत असताना सोमवारी सकाळी या दोन्ही भावंडांचे मृतदेह घराशेजारी असलेल्या महर्षी कर्वे उद्यानातील पाण्याच्या टाकीत मिळून आले होते. (Mumbai Crime)
मुंबई महानगरपालिकेच्या या उद्यानात जमिनीत ६ फूट खोल आणि ८ फूट लांब असलेल्या या पाण्याच्या टाक्यांची दोन्ही झाकणे गायब होती, त्या जागी काळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदाने ही झाकणाची जागा झाकण्यात आलेली होती. दोन्ही भावंडे खेळत असताना या टाकीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. या उद्यानाच्या देखरेखीच्या कामासाठी महानगरपालिकेने कंत्राटदार नेमला आहे. कंत्राटदाराने येथील प्रत्येक उद्यानासाठी सुपरवायझरची नेमणूक केलेली आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांच्या सभेला सशर्त परवानगी; उच्च न्यायालय म्हणाले, प्रक्षोभक भाषण नको)
उद्यानातील झाकणे गायब झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन झाकणे बसवणे अथवा खबरदारी म्हणून काही तरी उपाय करायला हवे होते. परंतु कंत्राटदार आणि सुपरवायझर या दोघांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन भावंडांचा या उघड्या टाकीत पडून मृत्यू झाला. माटुंगा पोलिसांनी सुपरवायझरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन्ही भावांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून भारतीय दंड विधान कलम ३०४(अ) (Causing Death By Negligence) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community