मुलीच्या प्रेमाला विरोध असणाऱ्या ४० वर्षीय आईने मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वांद्रे (Bandra) पूर्व येथे मंगळवारी उघडकीस आली.खेरवाडी पोलिसांनी (Mumbai Police) पोस्टमार्टेम अहवालावरून आईच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Hotels In Indore : इंदूरमध्ये लक्झरीयस हॉटेल्सच्या शोधात आहात ? पहा ‘हे’ पर्याय…)
टिना बगाडे (४०) असे अटक करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. टिना ही १९ वर्षीय भूमिका या मुलीसोबत वांद्रे पूर्व खेरवाडी पोलीस ठाण्याच्या (Kherwadi Police Station) हद्दीत राहण्यास होती.भूमिकाचे रोहित नावाच्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणाला आईचा तीव्र विरोध होतापरंतु भूमिका ही आईचा विरोध झुडकारून प्रियकराला गुपचूप भेटायला जात होती. (Mumbai Crime)
मुलीचे असे वागणे आई टिनाला आवडत नव्हते, यावरून मायलेकीत खटके उडू लागेल होते. रविवारी भूमिका ही प्रियकर रोहितला भेटण्यासाठी बाहेर गेली आणि परत आल्यावर तिच्या आईने तिला पुन्हा खडसावले, व त्याचा नाद सोडून दे म्हणून सांगितले. परंतु भूमीकाने आईला स्पष्ट बजावले होते, मी त्याच्या सोबत लग्न करणार आहेयावरून मायलेकीत पुन्हा वाद झाला परंतु रविवारी झालेला वाद विकोपाला गेला आणि आई टिनाने भूमिकाला मारले, भूमीकाने आईच्या बोटाला चावा घेतल्यामुळे संतापलेल्या आई टिनाने भूमिकाचा गळा आवळून तिची हत्या केली. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Diva Railway Station : वीज येताच सरकता जिना उलट्या बाजूने सुरू झाला, प्रवाशांचा पडता पडता वाचला जीव)
मुलीच्या आपल्या हातून हत्या झाल्याचे कळताच टिनाने हत्या झाल्याचे लपविण्यासाठी मुलगी भूमिकाला तात्काळ सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई (V. N. Desai) या रुग्णालयात आणून मुलगी फिट येऊन पडल्याचे डॉक्टराना सांगितले.डॉक्टरांनी भुनिकाला तपासून मृत घोषित करून पोलिसांना कळवले.खेरवाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला.मंगळवारी पोस्टमार्टेम चा अहवाल आला असता,पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या मानेवर जखमांच्या खुणा असलेल्या मृत्यूचे कारण गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले.निर्मल नगर पोलिसांनी टीनाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ (Murder) आणि २०१ (Disappearance of Evidence of the Offence)अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आईला अटक केली. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community