मोबाईल चोरी करून पळणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी त्याच्या मागे धावणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Crime) दलाचा मोबाईल चोरांनी बळी घेतला, या चोरांनी पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) पकडून विषारी द्रव्य पाजल्याने या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना माटुंगा – सायन रेल्वे स्थानका दरम्यान घडली. विशाल पवार (Vishal Pawar) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून विशाल हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. ठाण्यातील कोपरी येथे राहणारा विशाल पवार मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवासी आहे. (Mumbai Crime)
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दादर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल विशाल पवार (Vishal Pawar) हे रात्रपाळीसाठी लोकल ट्रेनमधून ड्युटीसाठी जात असताना दारात उभे राहून फोनवर बोलत होते. माटुंगा आणि सायनच्या (Matunga and Sion) मध्ये लोकल ट्रेनची गती कमी झाली त्यावेळी फटका गॅंगने त्यांच्या हातावर फटका मारला असता पवार यांच्या हातातील मोबाईल खाली पडला, चोरट्याने तो उचलून पळ काढला असताना विशाल पवार (Vishal Pawar) यांनी ट्रेन मधून उडी घेऊन रुळातून चोरांचा पाठलाग सुरू केला, काही अंतर फटका गॅंग मधील चोरट्यानी पवार यांना घेरले व त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पवार यांनी प्रतिकार केला असता त्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यानंतर पवार यांना फटका गॅंगच्या काही सदस्यांनी पकडून ठेवले व एकाने पवार यांच्या पाठीवर विषारी द्रव्य असलेले इंजेक्शन टोचुन पवार यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव ओतले,त्यानंतर पवार यांची शुद्ध हरपून ते जमिनीवर कोसळले. (Mumbai Crime)
दुसऱ्या दिवशी सकाळी पवार शुद्धीवर आले आणि त्यांनी कसेबसे आपले घर गाठले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पवार यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सोमवारी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल केले. स्थानिक कोपरी पोलीस ठाण्याने त्यांचा जबाब त्यांचे नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ (दरोडा), ३९४ (लुटताना दुखापत करणे), ३२८ (विषारी द्रव्य प्राशन करून इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार (Vishal Pawar) यांची प्रकृती अधिकच खालावली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलिसच सुरक्षित नसून सामान्य प्रवाश्याचे काय असा प्रश्न विचारला जात आहे. (Mumbai Crime)
पुढील तपासासाठी हे प्रकरण कोपरी पोलीस ठाण्यातून (Kopri Police Station) दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आले आहे. आयपीसी कलम 302 (हत्या) जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत, असे डीसीपी पाटील यांनी सांगितले. (Mumbai Crime)
३० वर्षीय विशाल पवार (Vishal Pawar) हे २०१५ मध्ये पोलिस खात्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील चाळीसगाव, जळगाव येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना मूलबाळ नव्हते. त्याची पत्नी गेल्या आठ दिवसांपासून नाशिक येथे तिच्या आईच्या घरी होती. पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गावी नेण्यात आले आहे, अशी माहिती दादर जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.डॉक्टरांनी अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केले नसून ते राखून ठेवले आहे, असेही कदम म्हणाले. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community