मुंबईतील पूर्व उपनगरातून अपहरण झालेक्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.ही घटना गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात घडली असून या घटनेने पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.चिमुरडीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिवाजी नगर पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद घेतली आहे. (Mumbai Crime News)
(हेही वाचा- ICC Test Championship : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारताचं कसोटी अजिंक्यपद अव्वल स्थानही धोक्यात)
पूर्व उपनगरातील गोवंडी शिवाजी नगर येथे राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षाची मुलगी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याचा सुमारास राहत्या घराजवळून गूढरित्या बेपत्ता झाली होती. पहाटे या चिमुरडीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या गटारीत मिळून आला. (Mumbai Crime News)
परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री बेपत्ता झालेल्या चिमुरडीच्या कुटूंबियांनी दोन तास शोध घेतल्यानंतर अखेर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता तक्रार दाखल केली, पोलीस ठाण्यात तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांचे पथक रात्रभर बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या गटारीत मुलीचा मृतदेह मिळून आला. (Mumbai Crime News)
(हेही वाचा- Yashasvi Jaiswal : ‘या’ विक्रमासह यशस्वी जयस्वाल सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या पंक्तीत)
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा अथवा मारलेले व्रण आढळून आलेले नाही,तसेच मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे कुठल्याही निशाण डॉक्टरांना आढळून आलेले नाही, प्राथमिक तपासणीमध्ये मुलीच्या फुफ्फुसामध्ये गटाराचे पाणी मिळून आले आहे, परंतु मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी दिली. डॉक्टरांनी मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. (Mumbai Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community