रुग्णांना आयुर्वेदिक औषधावर १०० टक्के बरे करण्याचे आश्वासन देऊन रुग्णाच्या नातेवाईकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीतील चार जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीना अटक न करता त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ही टोळी आपले सावज हेरण्यासाठी मुंबईतील केईएम, वाडिया आणि टाटा रुग्णालयाबाहेर सापळा लावून रुग्णाच्या नातेवाईकाना जाळ्यात अडकवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime News)
चालू स्वामी मेलकुंडी (२९), मंगेश वरघंटी (२७), परशुराम मल्लाखुले (३६)आणि दिनेश वरघंटी (२४)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन आरोपी अंधेरी तर दोघे जण मानखुर्द येथे राहण्यास आहे. ही टोळी मुंबईतील टाटा मेमोरियल, केईएम, वाडिया, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर, जेजे तसेच कस्तुरबा रुग्णालयात फिरून आजराने अति त्रासलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना हेरून, त्यांना रुग्णालयाच्या बाहेर गाठत असे, त्यानंतर त्यांना रुग्णाला १०० टक्के आजारातून बरे करण्याचे आश्वासन देऊन रुग्णाच्या नातेवाईकाना आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी तयार करून त्यांच्या कडून औषधाच्या नावाखाली लाखो रुपये उकळून रुग्णांना आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली कारले, बाटली, आवळा, तुळशीचे रस किंवा पावडर देत होते. (Mumbai Crime News)
रुग्णांची आर्थिक स्थिती आणि त्याची निकड लक्षात घेऊन ५ हजार ते अडीज लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारायचे, २०२२ मध्ये भोईवाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता त्यात त्यांनी रुग्ण बरा होण्याचे आश्वासन देऊन रुग्णाच्या नातेवाईकाकडून अडीज लाख रुपये घेतले होते, ते त्यांना काढा किंवा पावडर खाण्यासाठी देत होते, एका महिन्याच्या उपचारानंतर त्यांच्या नातेवाईकांना बरे करू त्यानंतर त्यांना ठाणे आयुर्वेदिक केंद्राकडे पाठवा असे सांगून फसवणूक करण्यात आली होती अशी माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. (Mumbai Crime News)
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आणखी काही तक्रारी भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून या चौघांना केईएम रुग्णालयच्या बाहेरून ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३कलम १२३ कायद्यानुसार इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे आणि ३१८(४) (फसवणूक) गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. (Mumbai Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community