पोलीस कर्मचा-याकडून IIT मध्ये शिकणा-या मुलीचा विनयभंग; मुंबईतील घटनेने खळबळ

दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस काॅन्स्टेबलने आयआयटीमधील तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पहाटेच्या वेळी ही तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी पोलिसांनी मुलीला अश्लील प्रश्न विचारले, असा आरोप मुलीने केला आहे. यानंतर या मुलीने आणि तरुणाने जवळच्या पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार दिली. परंतु,  त्या पोलीस ठाण्यातून त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्या दोघांनी त्यांच्या आयआयटीमधील वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली असता, त्यांनी संबंधित वरिष्ठांना ही बाब सांगितल्यानंतर त्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा: Google Doodle 2023: गुगलने बनवले नवं वर्षाच्या शुभेच्छा देणारे डूडल )

आरोपी राठोड याला निलंबित करण्यात आले आहे

ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. मुलासोबत बोलत असताना, पामबीचवर पोलिसाने आयआयटीमधील तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी नवी मुंबईमधील सानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस काॅन्स्टेबल राठोड याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपीला अटक करुन पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच, आरोपी राठोड याला निलंबित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here