मुंबईत ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नूडल्सचे आमिष दाखवून घरी बोलावले

दक्षिण मुंबईत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या ३ मुलींना शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय आरोपीने नूडल्स तसेच खाण्यापिण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी बोलावले आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

( हेही वाचा : माजी गृहराज्य मंत्री राम शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्र प्रदर्शनाला भेट )

३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या ३ मुलांनी खाण्यापिण्याचे आमिष दाखवले गेले आणि आरोपीने आपल्या घरी बोलावून दरवाजा बंद केला जेणेकरून या मुली घरातून पळून जाऊ नये त्यानंतर या मुलींवर अत्याचार करण्यात आला. घरी आल्यावर हा प्रकार पीडित मुलींनी सांगितला. असे पीडित मुलींच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

आईच्या तक्रारीआधारे एफआयआर 

मुलींनी या प्रकाराबद्दल आईला सांगितल्यावर सर्वांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. यानंतर जे.जे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आईच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३६७ (ब), ३४१, ३७७ आणि पॉक्सो कलम ४,५ आणि १२ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here