विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश

118
मुंबई – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीला १० तासांच्या अथक प्रयत्नानंतर सहार पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या नायजेरियन टोळीजवळून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
ओकोरोचा चिकाओद्री गॅब्रिएल आणि त्याचे इतर दोन सहकारी असे एकूण तीन नायजेरियन नागरिक असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरातील महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांना हे तिघे ड्रग्ज पुरवठा करीत असल्याचा आरोप या तिघांवर आहे. याबाबत मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाला या टोळीची माहिती मिळाली होती. हे तिघे सहार परिसरात राहत असून तेथून ते आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत होते. मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक या टोळीच्या मागावर होते.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहार पोलिसांच्या मदतीने मागील काही दिवसांपासून या टोळीवर पाळत ठेवली होती, त्यापैकी एकाला दोन दिवसांपूर्वी अटक करून त्याच्या इतर दोन सहका-यांना शुक्रवारी तब्बल १० तासांच्या अथक प्रयत्नानंतर अटक करण्यात आली आहे. ओकोरोचा चिकाओद्री गॅब्रिएल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्या संपर्कात अनेक ड्रग्ज पेडलर्स नायजेरियन आहे. त्यांच्या मदतीने तो मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करीत होता. मुंबईतील महाविद्यालयाच्या आसपास ही टोळी विद्यार्थ्यांना एमडी या अंमली पदार्थाचा पुरवठा करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन ड्रग्ज पुरवठादार यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा सापडलेला  नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.