लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार (Mumbai Crime News) टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी (२७ एप्रिल) रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी पैशांचे मोठे घबाड त्यांच्या हाती लागले. भांडूप परिसरात शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी (Police Nakabandi) करुन गाड्यांची तपासणी सुरु होती. यावेळी सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड (Cash Seized) आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. (Mumbai Crime News)
तपासाला सुरुवात
गाडीत रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे. (Mumbai Crime News)
नेमकं काय प्रकरण ?
निवडणूक भरारी पथकाकडून भांडूपच्या सोनापूर सिग्नलजवळ नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली. या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये तीन ते साडेतीन कोटी रुपये आढळून आले. व्हॅनमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना या रोकड रक्कमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने ही व्हॅन भांडूप पोलिसांच्या ताब्यात दिली. ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली? याबाबत आयकर विभाग अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले असून आयकर विभागाचे अधिकारी, निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. (Mumbai Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community