Mumbai Crime : अधिकृत पार्किंग देखील असुरक्षित; कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग मधून महागडी मोटारची चोरी 

63
Mumbai Crime : अधिकृत पार्किंग देखील असुरक्षित; कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग मधून महागडी मोटारची चोरी 
Mumbai Crime : अधिकृत पार्किंग देखील असुरक्षित; कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग मधून महागडी मोटारची चोरी 
मुंबईत अधिकृत वाहनतळ वाहनांसाठी सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे, दादरच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ (Kohinoor Square) या व्यवसायिक इमारतीच्या अधिकृत वाहनतळ (पार्किंग) मधून एका व्यवसायिकाची बीएमडब्ल्यू ही महागडी मोटार चोरट्यानी लांबवल्याची घटना रविवारी समोर आली आहे. हा चोरीचा प्रकार पार्किंग मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू (BMW) या महागड्या मोटारीचे मालकाचे नाव रोहन फिरोज खान (Rohan Feroze Khan) शिवाजी पार्क पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime)
रोहन खान हे बांधकाम व्यवसायिक आहे,आपली लाल रंगाची बीएमडब्ल्यू मोटार २७ ऑक्टोबर रोजी दादर येथील कोहिनूर स्क्वेअर या इमारतीच्या अधिकृत  पार्किंगमध्ये दुपारी १ वाजता पार्क केली होती,  त्याने मोटारीची चावी पार्किंग अटेंडंट बॅस्टिनला दिली आणि नंतर रोहित हा गोविंदानी आणि शारेक मोमीन या मित्रांसह ४८ व्या मजल्यावर असलेल्या बॅस्टिन हॉटेलमध्ये गेला. बॅस्टिन हॉटेल बंद झाल्यानंतर खान आणि त्याचे मित्र बाहेर गप्पा मारत होते. खान यांनी पार्किंग अटेंडंटला त्यांची मोटार आणण्यास सांगितल्यावर अटेंडंटने बराच वेळ घेतला त्यामुळे खान यांची  चिंता वाढवली. पार्किंग कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी मोटार  पार्क केलेल्या जागेवर नसल्याचे सांगितले. (Mumbai Crime)
खानने त्याच्या मित्रांसह आणि पार्किंग कर्मचाऱ्यांसह परिसरात शोध घेतला परंतु कार सापडली नाही. सीसीटीव्ही फुटेजचे तपासले असता त्यांना आढळले की अज्ञात व्यक्तीने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू चोरली. त्यानंतर खान यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे पोलिसांनी सांगितले. (Mumbai Crime)
हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.