Mumbai Drugs Case: मुंबई विमानतळावर ३४९६ ग्रॅम कोकेनसह संशयिताला अटक

24

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) नुकतीच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून आलेल्या एका लायबेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगचे वजन असामान्यपणे अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. त्यामध्ये ट्रॉली बॅगच्या तळाशी चोर कप्प्यात पांढरी भुकटी असलेली दोन पाकिटे सापडली. प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे एकूण वजन ३४९६  ग्रॅम (3496 grams of cocaine) इतके असून, बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य रु. ३४.९६ कोटी इतके आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपासणी सुरु आहे. (Mumbai Drugs Case)

(हेही वाचा – Assembly Election 2024: निवडणूक निकालाची अधिसूचना राज्यपालांना सादर)

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या धोक्यापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.