महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये घट

157
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये घट
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये घट

कोट्यवधींच्या मुंबईत दररोज अनेक गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांमुळे महिलांना नाहक अन्याय सहन करावा लागतो. पण गेल्या चार महिन्यांचा आढावा घेतला असता एक संतोषजनक बातमी हाती लागली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महिलांवरील अत्याचारात पाच टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते एप्रिल या पहिल्या चार महिन्यांत ९३ पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे १९७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नोंदवल्या गेलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी १४७० प्रकरणे सोडवण्यात आली आहेत. २०२२ च्या तुलनेत एकूण गुन्ह्यांमध्ये घट तर झालीच आहे पण त्यासोबतच ७४% प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

(हेही वाचा – Murder : दिल्लीत थरारक हत्याकांड; धर्मांध मुसलमान युवकाने हिंदु मुलीवर ३६ वार करून केले ठार)

आकडेवारी २०२३

गुन्हे                एप्रिलपर्यंत          उकल           यशाचे प्रमाण
बलात्कार              ३२५              २८६               ८८%
अपहरण               ४०७              ३३२               ८२%
हुंडाबळी               २२८              ८६                ३९%

आकडेवारी २०२२

गुन्हे                  एप्रिलपर्यंत        उकल            यशाचे प्रमाण
बलात्कार              ३०४              २४७                ८१%
अपहरण               ३५७             २५९                ७३%
हुंडाबळी               २९५              ७२                 २४%

पोलिसांच्या उपाययोजनांना यश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकरात लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशांमुळे आता ६० दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्यात येते.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी महिलांच्या सुरक्षेला अग्रणी ठेवून पुढील सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  • सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे
  • निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही लावणे
  • एकाकी महिला असतील तर त्यांना घरी नेण्याची व्यवस्था करणे
  • निर्भया पथक
  • निर्भया पेटी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.