मुंबईत पुन्हा Hit and Run; अल्पवयीन आरोपीसह तिघांना अटक

148
मुंबईत पुन्हा Hit and Run; अल्पवयीन आरोपीसह तिघांना अटक
मुंबईत पुन्हा Hit and Run; अल्पवयीन आरोपीसह तिघांना अटक

मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरात भरधाव कारने दुचाकीस्वारावर धडक दिली आहे. मुंबई पुन्हा हिट अँड रनच्या (Hit and Run) केसने हादरली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

(हेही वाचा-Agriculture Ministry : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय १ एकर परिसरात ‘मातृ वन’ उभारणार)

या अपघातामध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एसयुव्ही कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुणाला धडक दिली आणि तो जोरात आदळला. कारनं दिलेली धडक इतक्या गंभीर स्वरुपाची होती, की दुचाकीवर असणाऱ्या तरुणाला घटनास्थळीच गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात नेलं पण, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. (Hit and Run)

(हेही वाचा-खलिस्तानी समर्थक माजी खासदार Simranjit Singh Mann यांची घसरली जीभ; म्हणाले…)

या भीषण अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तीन जणांना अटक केली असून, त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचं म्हटलं जात आहे. आरोपींना ताब्यात घेत त्यांची कारही जप्त करत आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. (Hit and Run)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.