- प्रतिनिधी
दोन कोटींच्या लाच (Bribe) प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी मंदार तारीला गुरुवारी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तारी याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंदार तारी (४३) हा मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी ‘के’ वॉर्ड येथे पदनिर्देशित अधिकारी म्हणून कार्यरत होता.
(हेही वाचा – २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षासाठी अभय योजना लागू; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत माहिती)
मुंबई महानगरपालिकेच्या ‘के’ वॉर्डच्या हद्दीत येणाऱ्या जागेवरील बांधकाम न तोडण्यासाठी मंदार तारी याने बांधकाम व्यावसायिकाकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून लाचेचा पहिला हप्ता ७५ लाख रुपये स्वीकाराताना ७ ऑगस्ट रोजी दोन खाजगी इसमांना अटक करण्यात आली होत. त्यावेळी महानगरपालिकेचा पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी हा तिथून पळून गेला होता. (Bribe)
(हेही वाचा – अखेर Bangladesh सरकारला जाग आली; मंदिर तोडफोडीप्रकरणी चौघांना अटक)
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासानंतर ७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर मंदार तारी हा फरार झाला होता. मंदार तारीने अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर मंदार तारी हा गुरुवारी स्वतःहून न्यायालयात हजर राहिला असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे. (Bribe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community