Mumbai Police : गिरगावच्या भोईवाडा भागात १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त; ५ जण ताब्यात

74
Mumbai Police : गिरगावच्या भोईवाडा भागात १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त; ५ जण ताब्यात
Mumbai Police : गिरगावच्या भोईवाडा भागात १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त; ५ जण ताब्यात

राज्यात विधानसभा २०२४ (Legislative Assembly 2024) च्या निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान,  राज्यात आदर्श आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे काही गोष्टींवर निर्बंध येतात. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे रोख रक्कम बाळगण्याबाबतचा आहे. निवडणुकीच्या काळात मते मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसेच छापेमारी करत असतात. अशाच एका छापेमारीत मुंबईतील भुलेश्वर (Mumbai Bhuleshwar road) येथे आयकर विभागाला करोडो रुपयांची रोख रक्कम हाती लागली आहे.     (Mumbai Police)

मिळेल्या माहितीनुसार, भुलेश्वर मार्केटजवळील भोईवाडा (Bhoiwada) परिसरात पाच जण रोकड भरलेल्या पिशव्या घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि निवडणूक आयोगाच्या देखरेख पथकासह या पाच जणांना अटक केली. पोलिसांनी या लोकांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात एकूण १.३२ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. अधिकाऱ्यांनी रोख रकमेबाबत विचारणा केली असता, ते कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर ही रोकड जप्त करण्यात आली. संपूर्ण रोकड आयकर विभागाकडे (Income Tax)सुपूर्द करण्यात आली.  (Mumbai Police)

(हेही वाचा – Assembly Election : अणुशक्तीनगरमध्ये स्वरा भास्कर पतीसाठी निवडणूक प्रचारात उतरणार का?)

ही कारवाई व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे. या रोख रकमेचा उगम आणि त्याचा उद्देश काय होता, हे शोधण्यासाठी पोलीस ताब्यात घेतलेल्या पाच जणांची चौकशी करत आहेत. ही रोकड कोणत्या उद्देशाने आणण्यात आली आणि त्यात कोण कोण सामील आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.