स्वस्त प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन करत फिरणारी वादग्रस्त मॉडेल उर्फी जावेद हिचा नवा स्टंट आता तिच्या अंगाशी आला आहे. ओशिवरा पोलिसानी उर्फी जावेद आणि तिच्या सोबत व्हिडीओमध्ये पोलिसांची भूमिका करणाऱ्या तिघांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस आपल्याला अटक करीत असल्याचा व्हिडीओ बनवून उर्फीने प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला होता, अखेर मुंबई पोलिसांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे. (Urfi Javed)
अंगप्रदर्शन करून प्रसिद्धी मिळविणारी मॉडेल उर्फी जावेद ने ‘इन्स्टाग्राम’ वर एक रील टाकून नवा स्टंट केला होता.मुंबई पोलीस तीला अटक करण्यासाठी आली आहे,पोलीस गणवेशातील दोन महिला कॉन्स्टेबल आणि एक अधिकारी तीला अटक करून पोलीस जीपमध्ये बसवत असल्याचा स्टंट उर्फीने रील मध्ये केला होता, रीलचा तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे, व्हिडिओ पाहून उर्फीला खरेच मुंबई पोलिसांकडून अटक झाली आहे,असे वाटते.उर्फीकडून बनविण्यात आलेल्या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची जनसामान्यातील छबी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
(हेही वाचा : Mahad Fire : घटनास्थळी NDRF चे पथक दाखल ;अद्याप ७ जणांचा शोध सुरूच)
अखेर मुंबई पोलिसांकडून या व्हिडीओची गंभीरपणे दखल घेण्यात आली,शुक्रवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेद आणि पोलीसांची भूमिका करणारे इतर तिघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १७१ (सरकारी कर्मचाऱ्याचा पेहराव करून फसवणूक),४१९ (फसवणूक), ५०० (बदनामी करणे)३४ (सह) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात अद्याप अटक करण्यात आलेली नसून इतर सह आरोपीना नोटीस देण्यात आली आहे. शनिवारी पोलीस उर्फीला पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावणार असल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community