विधानसभा सदस्य तसेच आमदाराच्या स्टिकरचा गुन्हेगाराकडून गैरवापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथे उघडकीस आला आहे. निर्मल नगर पोलिसांनी एका कुख्यात सराईत गुन्हेगाराला त्याच्या मोटारीसह ताब्यात घेऊन त्याला नोटीस देण्यात आली आहे. त्याच्या मोटारीवर विधानसभा आणि आमदाराचे स्टिकर लावण्यात आले होते तसेच मोटारीच्या काचांना काळ्या फिल्म लावण्यात आल्या होत्या. ताब्यात घेण्यात आलेला सराईत गुन्हेगार हा छोटा राजन टोळीचा शार्प शूटर सतीश कालिया याचा जोडीदार आहे. (Mumbai Crime)
२५ सप्टेंबर रोजी पॅरोलवर बाहेर आलेला शार्प शूटर सतीश कालिया याने शहरात फिरण्यासाठी विधानसभा सदस्य आणि आमदार असलेल्या या मोटारीचा वापर करीत होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सतीश कालियाला पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाली असून कालिया हा सध्या संचित रजेवर (पॅरोल) तुरुंगातून बाहेर आला आहे. निर्मल नगर पोलिसांना ही मोटार कालियाचा सहकारी अकंदप्रताप सिंग उर्फ चंदन (३६) याच्या नावावर आहे. ही मोटार एका ठिकाणी रस्त्यावर उभी करण्यात आली होती. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Paralysis 0f Schoolgirls : धक्कादायक ! 90 शाळकरी मुली एकाच वेळी लुळ्या झाल्या; सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल)
गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आल्यामुळे ही मोटार ताब्यात घेऊन अकंदप्रताप सिंग उर्फ चंदन याच्या विरुद्ध भा. द. वि. कलम १७१,१०० (२) सह १७७ मोटर वाहन नियम १९८९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सिंग उर्फ चंदन याला सीआरपीसी ४१ अन्वये नोटीस देण्यात आली आहे. सिंग यांच्या विरुद्ध मुंबईत अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून तो २०१३ मध्ये खार येथील शारदा बार येथे प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी गोळ्या घालून ठार मारलेल्या विजय पुजारी उर्फ बट्टाच्या प्रकरणातही तो साक्षीदार आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की, सिंग बेकायदेशीर कामांसाठी विधानसभा सदस्य आणि आमदाराचे स्टिकर असणारी मोटार वापरत होता. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community