दररोज ३ ते ५ कोटींची उलाढाल करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक

188
दररोज ३ ते ५ कोटींची उलाढाल करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक
दररोज ३ ते ५ कोटींची उलाढाल करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक

भारतीयांची आर्थिक फसवणूक करून दिवसाला ३ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या एकाला बांगुर नगर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनिवास राव दाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो विशाखापट्टणम येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दडून बसला होता. श्रीनिवास दाडी हा दिवसाला ३ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल करणारा सर्वात मोठा सायबर गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दाडी हा चीन मधील गुन्हेगाराच्या थेट संपर्कात होता. भारतात फसवणूक केलेली रक्कम तो क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करून तो चीन देशातील सायबर गुन्हेगार यांना हस्तांतरित करत होता. दाडी हा भारतीय नागरिकांची फसवणूक करून दररोज ३ कोटी ते ५ कोटी रुपयांची उलाढाल करत होता. या गुन्ह्याशी संबंधित इतर चार जणांनाही अटक करण्यात आली आहे.

दाडी व त्याचे सहकारी नागरिकांना मुख्यत्वे महिलांना, स्काईप किंवा व्हॉट्सअ‍ॅप वरून कॉल करून पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या नावाने परदेशातून एक कुरिअर विमानतळावर आले आहे. त्या कुरिअरने पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे आढळून आल्याचा दावा करून ते आपल्या सावजाला भीती घालून त्यांच्याकडे मोठ्या रकमा वसूल करायचे. वेळ प्रसंगी आपल्या सावजाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पोलीस ओळख पत्र पाठवत होते.

(हेही वाचा – Crime : दिवंगत पोलीस उपायुक्त यांच्या पत्नीला खोलीत डांबून ४४ वर्षाच्या मुलाची हत्या

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आदी ठिकाणी अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्यात येते. दिल्लीतील अनेक घटनेत फसवणूक करणाऱ्याने खाकी गणवेश परिधान करून पीडितेला व्हिडिओ कॉल केला होता, त्याने स्वतःला मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून त्या महिलेकडून लाखो रुपये उकळले होते. बांगूर नगर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून माहिती मिळविण्यात आली, या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने फसवणूक झालेल्या महिलेने ज्या बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली, या आधारे महेंद्र रोकडे आणि मुकेश दिवे या दोघांना टिटवाळ्यातून तर संजय मंडल आणि अनिमेष वैद या दोघांना कोलकाता येथून ताब्यात घेण्यात आले. या चौघांच्या चौकशीत ही टोळी देशभरात मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडून मुख्य एजंट एजंट दाडी यांच्याशी संपर्क साधून त्यांना खाते क्रमांक द्यायचे. दाडी हा आपल्या सावजाना हे खाते क्रमांक देऊन खात्यावर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडत होते. दाडी हा खात्यावर आलेले रकमा क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करत होता आणि तो चिनी नागरिकांकडे हस्तांतरित करत होता अशी माहिती समोर आली.

पोलीस पथकाला दाडीचा ठावठिकाणा हाती लागला होता, दाडी हा हैदराबादमध्ये राहत होता, परंतु त्याने पोलिसांच्या भीतीने हैद्राबाद येथून पळ काढून विशाखापट्टणम येथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये लपून बसला होता तेथून त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले.

पोलिसांनी त्याची ४० बँक खात्यांमधील दीड कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. दाडीने आपल्या पत्नीच्या बँक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्सफर केले असून दाडीच्या कुटुंबाचा ही या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
दाडी हा व्यवसायाने माजी सुरक्षा अधिकारी होता. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून सायबर गुन्ह्यात सामील होता पण तो कधीच पोलिसांच्या रडारवर नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.