मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळा सारखे दिसणार जसेच्या तसे संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) बनवलं होतं. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तगादा लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचं उघड झाले आहे. (Mumbai Police)
सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी कोणती काळजी घ्याल, याबाबत पोलिसांनी सांगितलं आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा :Pulses Price Hike: डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारकडून ‘प्रभावी’ उपाययोजना राबवण्याचा निर्णय)
सायबर फसवणूक टाळायची असल्यास अशा फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखता येणंही गरजेचं आहे. अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यात तुम्ही मुंबई पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोदवू शकता.असे आवाहन ही करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community