पित्यासाठी लेकीचे लग्न म्हटलं की, सर्वात मोठी जबाबदारी असते, परंतु त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पार पाडली, ती म्हणजे आपल्या कामाची. मुलीच्या विवाह सोहळ्यापेक्षा फणसळकर यांनी आपल्या कर्त्यव्याला महत्त्व देत मुंबईकरांची मने जिंकली.
( हेही वाचा : FIFA Final : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स! LIVE अंतिम सामना कुठे पाहणार, किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्व काही… )
आधी लगीन कर्तव्याचे मग…
एकीकडे लेकीच्या लग्नाची लगबग तर दुसरीकडे मुंबईत महाविकास आघाडी पक्षाचा महामोर्चा दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पोलीस दलातील सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले. स्वतः पोलीस आयुक्त फणसळकर आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर बंदोबस्ताची पाहणी करीत असल्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनोबल वाढले आणि सर्व काही सुरळीत पार पडले असे उद्गार काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी काढले.
मुलीचे विवाह सोहळा सोडून पोलीस आयुक्त रस्त्यावर…
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्न सोहळ्याच्या व्यवस्थेत व्यस्त होते, शनिवारी लग्नाचा दिवस होता पण फणसळकर यांनी प्रथम आपले कर्त्यव्य बजावत मोर्चाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे नेतृत्व केले आणि मोर्चा संपेपर्यंत ते रस्त्यावर थांबून राहिले. प्रत्येक पित्यासाठी आपल्या मुलीच्या लग्नापेक्षा मोठी कामगिरी कुठलीच नसताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रथम आपल्या कर्तव्याला महत्व देऊन स्वतः मोर्चाच्या ठिकाणी हजर राहिल्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई पोलिसांचे त्यामुळे मनोबल अधिकच वाढले.
Join Our WhatsApp Community