ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.(Uddhav Thackeray)
अधिक मिळालेल्या माहितीनुसार फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे मुस्लिम संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. तर हे तरुण उर्दूमध्ये संभाषण करत असल्याची माहिती फोन घेणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.
(हेही वाचा : President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसाच्या मेघालय आणि आसाम दौऱ्यावर)
याबाबत माहिती देताना मोहम्मद अली रोड येथे रूम रेंटवर घेणार असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने नियंत्रण कक्षाला सांगितले आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पोलीस याचा तपास करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community