Mumbai Police – Ed : १६४ कोटी रुपयांचे खंडणी प्रकरण : ईडी आणि पोलीस तपास यंत्रणेत अंतर्गत धुसफूस

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खंडणीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पश्चिम उपनगरातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात ईडीची भीती घालून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

294
Mumbai Police - Ed : १६४ कोटी रुपयांचे खंडणी प्रकरण : ईडी आणि पोलीस तपास यंत्रणेत अंतर्गत धुसफूस

मुंबई पोलीसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकारी यांचा संबंध जुळून येत असल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांमध्ये अंतर्गत धुसफूस (Mumbai Police – Ed) सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या पाठोपाठ या केंद्रीय तपास यंत्रणेने देखील मुंबई पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा तपास मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या १६४ कोटी रुपयांच्या खंडणीच्या संबंधित आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने ६ जणांना अटक केलेली असून त्यातील एक आरोपी हा केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकारी यांच्या संपर्कात असल्याचे देखील गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलेले आहे.

(हेही वाचा – शिंदे सरकार आठवड्यातून दोन वेळा का घेणार State Cabinet Meetings?)

६ जणांना अटक –

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने (Mumbai Police – Ed) जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खंडणीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पश्चिम उपनगरातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात ईडीची भीती घालून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणात ३१ जानेवारी रोजी अवनिष दुबे (४६),राजेंद्र शिरसाठ (५९), राकेश केडीया (५६),कल्पेश भोसले (५०),अमेय सावेकर (३८) आणि हिरेन भगत उर्फ रोमि भगत (५०) या ६ जणांना अटक केली होती.

ईडीने सुरु केला स्वतंत्र तपास –

अटक आरोपीपैकी हिरेन भगत उर्फ रोमी भगत याने पोलीस चौकशीत ईडी तसेच इतर सरकारी कार्यालयात ओळख असल्याचे त्याने सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासात ते स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने (Mumbai Police – Ed) न्यायालयात केला होता. या संदर्भात तपास करायचा असल्याचे सांगून गुन्हे शाखेने आरोपीची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात ईडीचे नाव येताच ईडीकडून गुन्हे शाखेच्या एफआयआरच्या आधारावर ईडीने या प्रकरणी ईसीआयआर (ECIR) नोंदवून स्वतंत्र तपास सुरू केला. १६४ कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेला सहावा आरोपी हिरेन भगत उर्फ रोमि भगत याच्याकडून गुन्हे शाखेने १३.६२ कोटी रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. या टोळीने विकासकाला अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हे शाखेला भगत यांच्या घरातून ईडी आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासल्या जात असलेल्या अनेक प्रकरणांशी संबंधित कागदपत्रेही सापडली आहेत.

(हेही वाचा – Lok Sabha Elections : वॅलेनटाईन डे ला एक मैत्री तुटण्याची शक्यता)

तसेच भगत यांच्या निवासस्थानाची (Mumbai Police – Ed) झडती घेण्यात आली, त्यादरम्यान पोलिसांनी १५० जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे आणि ५.१३ कोटी रुपयांचे भारतीय आणि विदेशी चलन, वॉकी टॉकी आणि रेडिओसह तीन अत्याधुनिक शस्त्रे जप्त केली. तपासादरम्यान, पोलिसांनी हिरेन भगतची बहीण रुणाली भगत हिचे जबाब नोंदवला तसेच तिच्या बँक लॉकरमध्ये ठेवलेली मौल्यवान वस्तू देखील हिरेनच्या असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : घरेलू कामगारांच्या नोंदणी शुल्कात कपात; चंद्रशेखर बावनकुळेंच्या पाठपुराव्याला यश)

पोलिसांनी दावा केला की,

झडतीदरम्यान त्यांच्या बहिणीच्या नावे कर्नाटक बँकेत दोन बँक खाती सापडली आणि त्यांच्याकडून ७.१९ कोटी रुपयांचे सोने, भारतीय चलनात ६७ लाख रुपये, विदेशी चलनातील ५६.९६ लाख रुपये, महागडी घड्याळे आणि अनेक करारपत्रे जप्त केले. हिरेन भगतने त्याच्या बहिणीच्या नावावर दुबईत ३.५ कोटी रुपयांचा फ्लॅटही खरेदी केला असून माहितीची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai Police – Ed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.