Mumbai Police : राजकीय धुळवडीवर खाकीचा वॉच, पोलीस आयुक्तांच्या मुंबई पोलीस दलाला सूचना

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी होळी आणि धुळवड या सणाचा वापर राजकीय पक्ष आणि संघटना शहरात विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतील,यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही आयुक्तांनी पत्रकात नमूद केले आहे.

180
Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर
Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी या सणाला राजकीय गालबोट लागू नये, तसेच धुळवडीवर राजकीय रंग चढू नये म्हणून दक्षता घेण्यात यावी अशी सूचना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाला दिले आहे. (Mumbai Police)
तसेच होळी (Holi) साजरी करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी यासाठी असामाजिक तत्वांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांनी पोलिसांना दिले आहे. (Mumbai Police)
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) प्रचार करण्यासाठी होळी (Holi) आणि धुळवड या सणाचा वापर राजकीय पक्ष आणि संघटना शहरात विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतील,यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही आयुक्तांनी पत्रकात नमूद केले आहे. लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत, निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिताच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारा कडून सण उत्सवाचा काळात निवडणुकीचा प्रचार केला जात असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (Mumbai Police)
राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी होळी आणि रंगपंचमी यासणाचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात एक पत्रक काढून धुळवडीवर राजकीय रंग चढू नये या साठी दक्षता घेण्यात यावी अशी सूचना पत्रकात दिली आहे. (Mumbai Police)
त्याच बरोबर होळी साजरी करण्याच्या नावाखाली लोकांची छेडछाड किंवा महिलांवरील कोणत्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी पोलिसांना  दिल्या आहेत. “मारामारी, महिला/मुलींचा विनयभंग किंवा इतर कोणतेही अनुचित वर्तन घडू नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन आणि लक्ष ठेवणे,” असे निर्देशात म्हटले आहे.
शहराच्या हद्दीत लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी भाषणे किंवा ध्वनिमुद्रण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.तसेच शहर पोलिसांच्या सर्व तुकड्यांच्या प्रमुखांना सण शांततेत साजरा व्हावा यासाठी धार्मिक नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. (Mumbai Police)
दरम्यान आयुक्तांनी जारी करण्यात आलेल्या पत्रकात मागील वर्षी  होळीच्या उत्सवादरम्यान संपूर्ण शहरात करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी दिली आहे, मुंबई २०२३ मध्ये होळी आणि रंगपंचमी उत्सव दरम्यान  मुंबई शहरामध्ये एकूण ३१ गुन्हे (१६ दखलपात्र व १५ अदखलपात्र) नोंद झालेले आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी होळीच्या कारणांवरुन १ दखलपात्र, रंग लावण्यावरुन व नाचगाण्यावरुन ५ दखलपात्र व १२ अदखलपात्र, हिंदु मुस्लीम वाद २ अदखलपात्र, मनाई आदेश भंग १ दखलपात्र व इतर कारणावरुन ९ दखलपात्र व १ अदखलपात्र असे गुन्हे दाखल आहेत. (Mumbai Police)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.