रिकव्हरीच्या नावाखाली दक्षिण मुंबईतील एका ज्वेलर्स मालकांची पिळवणूक करून मोबदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या आझाद मैदान पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह तीन जणांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. पोलीस उपनिरीक्षक काजल पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पालकर आणि सुदर्शन पुरी असे विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. पानसरे आझाद मैदान पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी असून पालकर आणि पुरी हे पानसरे यांच्या पथकात आहे. विभागीय चौकशी नंतर पालकर आणि पुरी यांची प्रकटीकरण पथकातून बदली करण्यात आलेली असून त्यांना ठाणे अंमलदार कक्षात सामान्य ड्युटी देण्यात आलेली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण मुंबईतील ज्वेलर्स निशांत जैन यांचे आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलरीचे दुकान आहे. १ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीन पोलिस अधिकारी त्यांच्या दुकानात होते, त्यांनी ज्वेलर्सने खरेदी केलेल्या चोरीच्या सोन्याच्या ब्रेसलेटशी संबंधित चौकशी केली, दरम्यान ते ब्रेसलेट विकत घेतलेले नसून लक्ष्मी आणि तिची मुलगी पंडिमा चौहान यांनी १८ हजार रुपयांमध्ये गहाण ठेवले असल्याचे ज्वेलर्स जैन यांनी पोलीस अधिकारी यांना सांगितले. (Mumbai Police)
दरम्यान चौकशीसाठी ज्वेलर्सला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि निशांत जैन हे वडील आणि लहान भावासह पोलीस ठाण्यात गेले. त्यांना डिटेक्शन खोलीत आणून धमकावण्यात आले, व शिविगाळ करीत बेल्ट उगारण्यात आला असा आरोप निशांत जैन यांनी मानवाधिकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. पोलिसांनी मला धमकावून गुन्ह्या दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली असा आरोप जैन यांनी अर्जात केला आहे. “आम्ही तपासात सहकार्य करायला आणि ब्रेसलेट परत करायला तयारी दाखवून परंतु जप्तीचा अहवाल पोलिसांकडे मागितला असता त्यांनी चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. त्यानंतर पोलीस (Mumbai Police) कॉन्स्टेबलने महिला अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार जैन यांनी अर्जात केला. (Mumbai Police)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘फेक न्यूज’ शेअर कराल तर पोलीस कोठडीत जाल)
तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, “मी पंचनामा आणि संबंधित कागदपत्रांसाठी आग्रह केला असता एक अधिकारी संतप्त झाला आणि त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्याने मला धमकावले, मी त्यांना म्हणालो माझ्याकडे रोख एवढी रक्कम नाही, मी फक्त वीस हजार देऊ शकतो, परंतु त्याने पन्नास हजारांचा आग्रह धरला आणि मला माझ्या वडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस (Mumbai Police) ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनच्या मागे एका कॉन्स्टेबलने २५ हजार रुपयांची रोकड स्वीकारली असा आरोप जैन यांनी अर्जात केला आहे. ज्वेलर्सने १२ मार्च रोजी तक्रार अर्ज वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडे केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या घटनेची विभागीय चौकशी सुरू केली असून महिला अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबल यांना प्रकटीकरण पथकातुन काढण्यात आले आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community