Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण

71
Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण
Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण
मुंबई शहर तसेच उपनगरातील नागरिकांचे चोरीला गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या ५०० मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मूळ मालकांना परत करण्यात आले आहे.नवीन वर्षाच्या पहिल्याच मुंबई पोलिसा कडून मिळालेल्या गिफ्ट मुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. माटुंगा,सायन,अंटोपहिल,वडाळा,भोईवाडा,काळाचौकी,आर ए के मार्ग आणि घाटकोपर पोलीस या पोलीस ठाण्याकडून मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले आहे. (Mumbai Police)
मुंबईतील शहर तसेच उपनगरात  चोरीला तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा छडा लावण्यासाठी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.या पथकात एक अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. या पथकाकडून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ (CEIR) या पोर्टलच्या माध्यमातुन तसेच इतर तंत्रज्ञान वापरून चोरीला गेलेले तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा फोनचा शोध घेऊन तो मोबाईल फोन देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला तरी जप्त करण्यात येतो. (Mumbai Police)
मागील वर्षी २०२४ मध्ये मुंबईतून चोरीला गेलेल्या मोबाईल फोन पैकी परिमंडळ ४ च्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांनी अवघ्या दहा दिवसांत सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ (CEIR) या पोर्टलच्या माध्यमातून तसेच इतर तंत्रज्ञानाचा वापर करून २०० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त आर. रागासुधा यांच्या मार्गदर्शनाखाली  माटुंगा, सायन,अंटोप हिल, वडाळा, भोईवाडा, काळाचौकी,आर ए के मार्ग  पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने जप्त केलेल्या मोबाईल फोनचे मूळ मालकांचा शोध घेऊन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मूळ मालकांना त्यांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन परत देण्यात आले.दरम्यान घाटकोपर पोलिसांनी CEIR या पोर्टलच्या माहितीच्या आधारे, व तांत्रिक कौशल्याचा मानवीय कौशल्य वापर करून माहितीच्या आधारे  निरंतर पाठपुरावा करूनमोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन  मुंबई तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार,पश्चिम बंगाल, विविध परराज्यातून ३०० मोबाईल फोन  किंमत ३७ लाख ७३ हजार रुपये मालमत्ता प्राप्त करून तक्रारदार यांना पाटीदार हॉल, एल बी एस रोड, घाटकोपर येथे वितरण करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच मुंबई पोलिसा कडून मिळालेल्या गिफ्ट मुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.  (Mumbai Police)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.