मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशीयांच्या (Bangladesh infiltrator) मुळावर घाव घालण्यास सुरू केले आहे. मुंबईत घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशीयांना आश्रय देणारे, तसेच त्यांना बेकायदेशीररित्या भारतात आणणारे आणि भारतीय असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या एजंटचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यास मुंबई पोलिसांनी सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ एजंट आणि डीएन नगर पोलिसांनी १ असे तीन एजंट यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये दोघे जण बांगलादेशी नागरिक (Bangladesh infiltrator) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या एजंटच्या चौकशीत बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर भारतात आणण्यासाठी तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्याचे आणि नोकरी आणि आश्रय देण्यासाठी बांगलादेशी नागरिकाकडून घेण्यात येणाऱ्या रकमेचे रेट कार्ड समोर आले आहे.
अंधेरीच्या डी.एन.नगर पोलिसांनी अटक केलेला ४२ वर्षीय बादशाह रशीद खान या घुसखोर बांगलादेशी (Bangladesh infiltrator) नागरिक आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून बेकायदेशीर राहणाऱ्या बादशाह खान हा एका एजंटच्या मार्फत भारतात आला होता, त्याने भारतात येण्यासाठी एजंटला काही रक्कम दिली होती, या एजंटने त्याची अंधेरीतील एका झोपडपट्टीत राहण्याची सोय केली होती अशी माहिती चौकशीत समोर आली, त्यानंतर खानने मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करून नारळ विक्रीपासून ते कंत्राटी कामगार आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. त्यानंतर तो स्वतः एजंट बनला आणि त्याने अनेक बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतात घेऊन आला होता अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. खान याने बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांकडून (Bangladesh infiltrator) प्रति व्यक्तीकडून ७०ते ८० हजार रुपये घेऊन त्यांना भारतात बेकायदेशीररित्या आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. डीएन नगर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खानने केवळ घुसखोर बांगलादेशी यांच्या निवासाची व्यवस्था केली नाही तर बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांना नोकरी मिळवून देण्यासही मदत केली आहे.
(हेही वाचा मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यास नामुष्की कुणाची? Fadnavis की Ajit Pawar?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान अंधेरीमध्ये नारळपाणी विकत असे, पण त्याने एका प्रख्यात औषध कंपनीत सुरक्षा पर्यवेक्षक आणि अंधेरीतील विविध निवासी सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले. याशिवाय, मुंबई महानगरपालिकाकडून जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नारळ आणि झाडे तोडण्यासाठी खानला बोलावले जात होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांना आश्रय देण्यात आणि त्यांच्या सेवेसाठी पैसे आकारण्यात खानचा हात होता. “त्याने केवळ राहण्याची व्यवस्था केली नाही तर पासपोर्ट आणि आधार आणि पॅन कार्ड यांसारखी बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात मदत केली. नोकरीच्या शोधात असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांमध्ये भारतीय पासपोर्टला मोठी मागणी आहे. अरब देश बांगलादेशी लोकांपेक्षा भारतीय कामगारांना प्राधान्य देतात, पासपोर्ट एजंटच्या मदतीने खान याने बांगलादेशी नागरिकाकडून ७० ते ८० हजार रुपये घेवुन त्यांचे बोगस भारतीय पासपोर्ट आणि व्हिसा तयार करून सौदी, दुबई येथे बांगलादेशी नागरिकांना भारतीय बनवून पाठविल्याचे समोर आले आहे. तपासात असे दिसून आले आहे की अनेक बांगलादेशी नागरिक सध्या खानच्या नेटवर्कद्वारे फसवणूक करून मिळवलेल्या भारतीय पासपोर्टचा वापर करून परदेशात काम करत आहेत,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राहुल गुप्ता या एजंटला अटक केली आहे. राहुल गुप्ता हा भारतीय असून तो अनेक वर्षांपासून बांगलादेशी नागरीकांना बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून दिले असून बनावट कागदपत्रे तो स्वतःच्या ताब्यात ठेवून सदर कागदपत्रांचा फायदा घेऊन तो बांगलादेशी नागरीकांना भारतामध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. २०२२ मध्ये भारतात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या सुलताना बेगम या बांगलादेशी महिलेला गुप्ताने बार डान्सर म्हणून कामाला ठेवले होते, सुलताना बेगम चे बनावट कागदपत्रे तयार करून रजनी प्रकाश पांडे असे नाव तीला देण्यात आले होते. एका एनजीओने गुप्ताच्या तावडीतून तिची सुटका करण्यात आली होती. या प्रकारे त्याने अनेक बांगलादेशी महिला आणि पुरुषांना भारतात बेकायदेशीर आणून त्यांची नोकरीची सोय करून त्यांचे बनावट कागदपत्रे तयार करीत होता अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community