Mumbai Police: एका पोलीस अधिकाऱ्याच्या चूकीमुळे संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही, हायकोर्टात हमीपत्र सादर

2869
Mumbai Police: एका पोलीस अधिकाऱ्याच्या चूकीमुळे संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही, हायकोर्टात हमीपत्र सादर
Mumbai Police: एका पोलीस अधिकाऱ्याच्या चूकीमुळे संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही, हायकोर्टात हमीपत्र सादर

दिंडोशी पोलीस ठाण्यातील (Mumbai Police) एका प्रकरणात आरोपीने पीडितेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. याप्रकरणात पीडितेचे कपडे जप्त करण्यात आले नाहीत. त्याची गंभीर दखल घेत त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. या आदेशानुसार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.

(हेही वाचा –Passport Office Closed : देशातील पासपोर्ट कार्यालयं ५ दिवस का आहेत बंद?)

एका पोलीस अधिकाऱ्यानं तपासात चूक केली, म्हणून संपूर्ण मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्यानं करत नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महिलांवरील अत्याचाराचा तपास मुंबई पोलीस नेहमीच गांभीर्यानं करतात असं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी (Vivek Phansalkar) मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. मुंबई पोलिसांचा प्रमुख या नात्यानं प्रत्येक तपास योग्य प्रकार केला जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची नैतिक जबाबदारी माझीच आहे असंही आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रातून नमूद केलं आहे. (Mumbai Police)

(हेही वाचा –भारतातील ‘या’ मुख्यमंत्र्यांचा पगार पंतप्रधानांपेक्षा जास्त)

या प्रकरणात मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला होता. याचा योग्य तपास करण्यात तपासअधिकारी अपयशी ठरला. पीडित मुलीचे कपडे जप्त करणं व त्याचा पंचनामा होणं आवश्यक होतं, जे झालं नाही. त्यामुळे तपासातील या त्रुटीचा फायदा आरोपीला झाल्याची कबुलीच या प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.