कुख्यात डॉन छोटा राजनचे बॅनर लावणे महागात पडले

mumbai posters praising underworld don chhota rajan
कुख्यात डॉन छोटा राजनचे बॅनर लावणे महागात पडले

कुख्यात डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसाचे बॅनर लावून वाढदिवस साजरा करणे एका सामाजिक संघटनेच्या चांगलेच महागात पडले आहे. या संस्थेच्या सहा जणांविरोधात मालाड पूर्व कुरार व्हिलेज पोलिसांनी गुन्हा दाखल करून या सहा आरोपींना नोटीस पाठविण्यात आली आहे.

कुख्यात डॉन छोटा राजन याला सीबीआयने अटक केली असून सध्या तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. मुंबईसह देशभरात, खून खंडणी, अपहरण सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या छोटा राजन याचा मुंबईत वाढदिवस साजरा केला जात आहे. छोटा राजन यांच्या नावाने सामाजिक संघटना उघडण्यात आलेल्या असून अशाच एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मालाड पूर्व कुरार व्हिलेजमधील तानाजी नगर येथे १३ जानेवारी रोजी छोटा राजन याचा वाढदिवसाचे बॅनर लावून वाढदिवस साजरा केला. तसेच ‘सी. आर.सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई’ या नावाच्या संघटनेने तानाजी नगर या ठिकाणी छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर लावून त्या बॅनरवर छोटा राजनचा फोटो लावण्यात आले होते.

कुरार व्हिलेज पोलिसांनी या बॅनरबाजीची दखल घेऊन हे बॅनर उतरवून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना नोटीस पाठविण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

(हेही वाचा – म्हाडा टेंडर प्रकरण : कंत्राटदारावर गोळीबार करणाऱ्या ४ हल्लेखोरांना अटक)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here