मुंबई, पुणे Terrorist च्या रडारवर; स्लीपर सेल कार्यरत; सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा

मुंबई पोलिसांकडून शहरातील हॉटेल, लॉज, मुसाफिर खाना तपासले जात असून स्लम विभागात खबऱ्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. मुंबईतील स्लम भागातील बेकायदेशीर कारवाया, तसेच बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे.

255

दहशतवादी (Terrorist) संघटनेचे स्लीपर सेल शहरात कार्यरत असून ऐन गणेशोत्सवाच्या काळात दहशतवादी (Terrorist) संघटनाकडून मुंबईला धोका निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली असून मुंबई पोलिसांना तसेच इतर सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून लॉज तसेच स्लम पॉकेट असणाऱ्या परिसरात तपासणी सुरू केली असून मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,  यासाठी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबईत १३ हजार पोलीस रस्त्यावर उतरविण्यात आले असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र एटीएसने मागील काही महिन्यांपूर्वी पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील पडघा या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या संघटनेचे (Terrorist)पुणे मॉड्युल उदध्वस्त करून या संघटनेचा  पुणे मॉड्युलचा म्होरक्या साकीब नाचनसह जवळपास ११ जणांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्याना अटक करून तपास यंत्रणेने दहशतवादी (Terrorist) संघटनेचा मोठा कट उधळून लावला होता. इसिसच्या रडारवर मुंबई पुण्यातील काही ठिकाणे होती, ज्या ठिकाणी या इसिसने घातपाताचा कट रचला होता.

(हेही वाचा शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा)

13 हजार पोलिसांचा फौजफाटा 

एनआयए आणि राज्य एटीएसने केलेल्या कारवाईत इसिसचे पुणे मॉड्युलचा प्रमुख आणि सदस्यांना अटक करण्यात आली असली तरी या मॉड्युलकडून तयार करण्यात आलेला स्लीपर सेल अद्यापही कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा स्लीपर सेल मुंबई पुण्यातील स्लम पॉकेट परिसर तसेच शहराच्या बाहेरील लॉजेस, हॉटेल या ठिकाणी कार्यरत असल्याची शक्यता असून या स्लीपर सेलकडून गणेशोत्सवाच्या काळात घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या इसिसच्या स्लीपर सेलचा मनसुबा उधळून लावण्यासाठी मुंबई पुणे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांकडून शहरातील हॉटेल, लॉज, मुसाफिर खाना तपासले जात असून स्लम विभागात खबऱ्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. मुंबईतील स्लम भागातील बेकायदेशीर कारवाया, तसेच बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे. एटीएस, गुन्हे शाखा संशयतावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान मुंबईत गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी १३ हजार पोलिसांची फोज रस्त्यावर उतरवली आहे, त्यात ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त, २,४३५ पोलीस अधिकारी, १२,४३० पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. (Terrorist)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.