मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात (Mumbai Pune Road Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात (Road Accident) झाला.
टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू
अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची वाहतूक केली जात होती. या ट्रकवर मागच्या बाजूने कोंबड्यांनी भरलेला टेम्पो जोरात येऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जोरदार धडकेमुळे ट्रक आणि टेम्पोला आग लागली. त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे. (Mumbai Pune Road Accident)
दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे टेम्पो चालकाचा मृतदेह आतमध्ये अडकून पडला होता. याशिवाय, टेम्पोला अपघातानंतर आग लागल्याने मदतकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. (Mumbai Pune Road Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community