Mumbai Alert: मुंबईत हायअलर्ट! मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलिसांकडून ‘मॉक ड्रिल’

88
Mumbai Alert: मुंबईत हायअलर्ट! मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'
Mumbai Alert: मुंबईत हायअलर्ट! मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'

दहशतवाद्यांकडून (terrorist Attack) मुंबईला धोका (Mumbai Alert) आहे, अशी माहिती सेंट्रल एजन्सी यांच्याकडून मुंबई पोलिसांना मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत आणि मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस अलर्ट (Mumbai Alert) मोडवर असून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

(हेही वाचा-Akshay Shinde Encounter : …तर हे एन्काऊंटरच घडले नसते; माजी पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती)

गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर’मॉक ड्रिल्स’ (Mock drills) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉकड्रिल केलं. हा तो परिसर आहे, जिथे मोठी गर्दी होते आणि येथे दोन प्रमुख धार्मिक स्थळं आहेत. आगामी काळात विधानसभा आहे, या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत होते. (Mumbai Alert)

(हेही वाचा-Agniveer यांना ‘ब्रह्मोस’मध्ये नोकऱ्यांचे आरक्षण, विरोधकांच्या बेरोजगारीच्या नॅरेटिव्हला चपराक)

संभाव्य दहशतवादी धोक्यांबाबत केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या सतर्कतेनंतर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या अलर्टनंतर धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Alert)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.