Crime : वाकोला पोलीस कोठडीतून आरोपीचे पलायन

254
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक

पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व वाकोला पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. वाकोला पोलिसांनी आरोपी विरुद्ध नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी एक विशेष पथक गठीत करण्यात आला आहे. (Crime)

महेश गुरव (२७) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश गुरव याला वाकोला पोलिसांनी सोमवारी एका घरफोडी प्रकरणात अटक केली होती. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरव याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला वाकोला पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यापूर्वी त्याने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितले. (Crime)

(हेही वाचा – Dombivli News : मस्करीची झाली कुस्करी! तिस-या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल)

पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यातील शौचालयात जाण्यास सांगून एक पोलीस शिपाई शौचालयाच्या बाहेर थांबलेले होते. बराच वेळ होऊन आरोपी गुरव हा बाहेर येत नसल्यामुळे पोलीस शिपाई बघायला गेले असता शौचालयाचे दार आतून बंद होते. पोलिसांना संशय येताच त्यांनी शौचालयाच्या मागे जाऊन तपासले असता शौचालयाच्या खिडकीचे गज वाकलेले होते, तेथून गुरव या आरोपीने पळ काढल्याचे समोर आले. आरोपी पळून गेल्याचे कळताच त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. महेश गुरुव याला सोमवारी रात्री सांताक्रूझ (पूर्व) येथील एका सलून मालकाच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.