Mumbai Vehicle Thief: मुंबई पोलिसांनी जाहीर केली आकडेवारी; पाच महिन्यांत वाहन चोरीची संख्या हजाराच्या घरात!

172
Mumbai Vehicle Thief: मुंबई पोलिसांनी जाहीर केली आकडेवारी; पाच महिन्यांत वाहन चोरीची संख्या हजाराच्या घरात!
Mumbai Vehicle Thief: मुंबई पोलिसांनी जाहीर केली आकडेवारी; पाच महिन्यांत वाहन चोरीची संख्या हजाराच्या घरात!

मुंबईसह आसपासच्या परिसरात दिवसागणिक वाहन चोरीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ होत असून, या गुन्ह्यांची उकल सुद्धा निम्म्यावर असल्याचे मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) दाखल होत असलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत वाहनचोरी संबंधित एक हजार ८४ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी निम्म्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. हँडल लॉक असले तरी चोरटे हात सफाईने दुचाकी चोरत (Two-wheeler thief) असल्याचे दिसून येत आहे.  (Mumbai Vehicle Thief)

दरम्यान मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे दरम्यान मुंबईत एकूण २३ हजार १३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५ हजार ९१० गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये दिवसाला सात ते आठ वाहनचोरीच्या घटना घडत असून, त्यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढत आहे. या पाच महिन्यांत मुंबईत वाहनचोरीचे एकूण १०८४ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी ५५७ गुन्ह्यांची उकल झाली. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत मुंबईत १ हजार ४५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. (Mumbai Vehicle Thief)

मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये मोटार वाहनचोरीविरोधी पथक बंद करण्याचा निर्णय घेतला. हे पथक मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आले आहे. मुंबईतून चोरी होणाऱ्या बहुतांश गाड्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये नेण्यात येतात. तसेच मुख्यत्वे करून चोरलेल्या गाड्यांचाच गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो.  (Mumbai Vehicle Thief)

(हेही वाचा – India Win T20 World Cup : विराट, रोहित आणि जाडेजाची जागा कोण घेणार?)

भंगारात पार्टची स्वस्तात विक्री –

रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांचे पार्टची मुंबईसह अन्य शहरांत विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात, तर काही जण भंगारातील दुचाकींचे अवेध इंजिन नंबर लावून त्यांची विक्री करतात. तसेच भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून चोरी करायची. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे, तर काही ठग बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मीडियावर देखील विक्री करताना दिसून आले. (Mumbai Vehicle Thief)

(हेही वाचा – Indian Railway: रेल्वेच्या ‘या’ गाड्यांची वेळ आणि टर्मिनल बदलले! जाणून घ्या एका क्लिकवर )

१०-१५ गुन्ह्यांचा लागतो छडा-

एखादी वाहनचोरांची टोळी (Gang of thieves) पकडल्यास किमान १० ते १५ गुन्ह्यांची उकल होत असल्याचे पोलिस कारवाईतून दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगळ्या पथकाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Mumbai Vehicle Thief)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.