कुर्ल्यात ड्रग्स पेडलर्स महिलेवर सामूहिक अत्याचार

93

महिला ड्रग्स पेडलर्सच्या घरात घुसून तिघांनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तिला सिगारेटचे चटके दिल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. या संदर्भात पीडित महिलेने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होव्हाळे यांनी दिली.

( हेही वाचा : RTO चा मोठा निर्णय! प्रवासी वाहनांमध्ये ‘ही’ सुविधा नसल्यास होणार दंडात्मक कारवाई)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित महिला ४८ वर्षांची असून ती कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिच्यावर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक तसेच केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागात गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थ क्षेत्रात महिला ड्रग्स माफिया म्हणून तिची ओळख आहे, तीन दिवसांपूर्वी पीडित महिलेने कुर्ला पोलीस ठाण्यात येऊन तिच्यावर घरात घुसून तिघांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती, तिघांपैकी एक जण तिचा ओळखीचा असून तो देखील अमली पदार्थाच्या धंद्यात गुंतलेला आहे.

तिघे जण रात्रीच्या सुमारास घरात घुसले व त्यांनी चाकूचा धाक दाखवत बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, त्यानंतर या महिलेला मारहाण करून शरीरावरील काही भागावर सिगारेटचे चटके दिले व जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पीडित महिला ही उपचारासाठी मनपा रुग्णालयात भरती झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध सामूहिक अत्याचार, मारहाण करणे, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होव्हाळे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.