Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, 

Munawar Farooqui : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या हॉटेल सबलन हुक्का पार्लरमध्ये मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकला.

439
Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, 
Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, 
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) समाज सेवा शाखेने मंगळवारी रात्री दक्षिण मुंबईतील एका हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) छापा टाकून स्टँड-अप कॉमेडियन (Stand-up comedian), रॅपर आणि गायक असलेल्या मुनावर फारुकीसह (Munawar Farooqui) अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते.दरम्यान त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. फारुकी याला यापूर्वी २०२१मध्ये हिंदूंची भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.जवळपास एक महिन्यांनी तुरुंगातून तो बाहेर पडला होता. (Munawar Farooqui)
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या हॉटेल सबलन हुक्का पार्लरमध्ये (Hookah Parlour) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) समाजसेवा शाखेने मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकला. पोलिसांच्या छापेमारीत अनेक तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते, त्यात बिग बॉस (Big Boss) विजेता स्टँड-अप कॉमेडियन (Stand-up comedian) मुनावर फारुकीचा समावेश होता. रात्री उशिरापर्यत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात फारुकी आणि इतरांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम २८३ (सार्वजनिक मार्गात किंवा मार्गात धोका किंवा अडथळा), ३३६  (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य), गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या फारुकी सह सर्वाना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Munawar Farooqui)
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या पथकाने हर्बलच्या नावाखाली  सुरू असणाऱ्या सबलन हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) छापा टाकला, या ठिकाणी हर्बलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नशा करण्यात येत होती, मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी या पार्लरमध्ये हुक्क्या माध्यमातून नशा करताना आढळून आली, त्यात स्टँडअप कॉमेडियन (Stand-up comedian) मुनावर फारुकी (Munawar Farooqui) याचा देखील समावेश होता. (Munawar Farooqui)
दरम्यान २०२१ मध्ये, मुनावरला (Munawar Farooqui) स्टँड-अप कॉमेडी परफॉर्मन्स दरम्यान  हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. भाजपचे खासदार यांचे पुत्र एकलव्य सिंह गौड यांच्या तक्रारीवरून फारुकिसह अन्य चार जणांसह अटक करण्यात आली. ३७ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर मुनवरला जामीन मंजूर झाला. (Munawar Farooqui)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.