Munawar Faruqui ने अनेक मुलींना प्रेमसंबंध ठेवून फसवले; आयशा खाननंतर आता नाझिलाने केला पर्दाफाश

367
हिंदू देवी-देवतांवर अश्लील विनोद करणारा स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्या कुकृत्याचा पर्दाफाश करण्यात आला. त्याची आधीची प्रेयसी नाझिला सिताशी हिने मुनव्वरचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध असून त्यांची त्याने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी बिग बॉसमध्ये गेलेली इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आयशा खान हिनेही मुनव्वरवर असेच आरोप केले होते. आता नाझिलाने लाईव्ह येऊन तिने तिची कहाणी सांगितली. याआधी स्टॅन्ड अप कॉमेडीच्या कार्यक्रमात मुनव्वर फारुकी याने भगवान श्रीरामच्या 14 वर्षांच्या वनवासावर अश्लील टिप्पणी केली होती. त्याच्यावर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली.
नाझिला म्हणाली, मला माहित नव्हते की, आयेशा आणि मुनव्वर (Munawar Faruqui) एकत्र आहेत, मला पूर्णपणे वेगळी गोष्ट सांगितली गेली. मुनव्वरने मला खात्री दिली की, त्याच्या आयुष्यात मी एकमेव मुलगी आहे जिच्यावर तो प्रेम करतो. पण ते खरे नव्हते आणि तो इतर अनेक मुलींसोबतही होता ज्यांच्याबद्दल मला बोलायचे नाही. नाझिलाच्या व्हिडिओनंतर मुनव्वरवर (Munawar Faruqui) ती अल्पवयीन असताना तिला आमिष दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ती म्हणाली, मुनव्वर फक्त आयशासोबत असता तर ते क्षम्य ठरले असते, पण त्यावेळी तो इतर मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून होता. आता माझा मुनव्वरशी कोणताही संबंध नाही.

मुनव्वर फारुकीचे वादग्रस्त पार्श्वभूमी 

नाझिलाने मुनव्वरवर (Munawar Faruqui) इतरही अनेक खळबळजनक आरोप केले. ती म्हणाली, “मी गप्प राहिले कारण तो त्याच्या बचावात काय बोलेल हे मला पहायचे होते. हे सर्व खोटे होते आणि मी त्यावर समाधानी नाही. मला ना कोणाला स्पष्टीकरण द्यायचे आहे आणि ना मला लोकांनी याबद्दल बोलायचे आहे. पण गोष्टी इतक्या वाढल्या की, मला थेट जाहीरपणे बोलावे लागले. याआधी, बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आयशाने मुनव्वरला टास्कमध्ये घेतले होते आणि त्याच्या अनेक नात्यांबद्दल विचारले होते. यावर मुनव्वर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणाला होता की, त्याच्या आणि नाझिलाच्या मनात अजूनही एकमेकांबद्दल भावना आहेत आणि दोघांना पुन्हा एकत्र यायचे आहे. मात्र, नाझिलाने मुनव्वरचे हे दावे फेटाळले असून त्याच्यावर फसवणूक करून सर्व संबंध संपवल्याचा आरोप केला आहे. मुनव्वरने आयेशाची माफीही मागितली. मुनव्वर फारुकी हा कायम वादात सापडतो. तो स्टॅन्ड अप कॉमेडी करताना हिंदूंच्या देवी-देवतांची खिल्ली उडवतो, तर कधी दुर्गापूजेच्या वेळी गरबा खेळायला जातो, असेही मुनव्वर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.