Munawar Faruqui लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर? सुरक्षेत केली वाढ

99
Munawar Faruqui लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर? सुरक्षेत केली वाढ
Munawar Faruqui लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर? सुरक्षेत केली वाढ

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने (Bishnoi Gang) स्वीकारली असून याचं कनेक्शन सलमान खानसोबत जोडण्यात आलं आहे. यानंतर आता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्याही (Munawar Faruqui) जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मुनव्वरच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे.

मुनव्वर बिष्णोई गँगच्या रडावर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, मुनव्वर सध्या दुबईत असून तो भारतात येताच त्याची सुरक्षा वाढवणार आहेत. दरम्यान या आरोपींनी मुनव्वर दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याचीही रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर बिष्णोई गँगच्या रडावर असल्याचं सांगण्यात येत आहे. (Munawar Faruqui)

…म्हणून मुनव्वर निशाण्यावर
यापूर्वी मुनव्वर फारुकीला धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी धमकी आणि हॉटेलमध्ये बिष्णोई टोळीच्या कार्यकर्त्यांचा मुक्काम जोडला असता परिस्थिती जुळली. यानंतर असे मानले जात होते की हे दोघेही मुनव्वर फारुकी शूट करण्याचा प्लॅन घेऊन आले होते. मुनव्वर फारुकीही आपल्या शोमध्ये धर्माशी निगडीत टोमणे मारत असल्याने ही भीती व्यक्त करण्यात आली होती. यावरही बिष्णोई टोळीचा राग कायम आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. हे पाहता कपिल शर्माच्या नावाचीही नेटकऱ्यांकडून चर्चा होत आहे. कारण कपिल शर्माच्या शोची निर्मिती सलमान खानने केली होती. या सर्व घटनांनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉमेडियन्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आणि या घटनांचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. (Munawar Faruqui)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.