वरळी नाका येथे असणाऱ्या एका स्पा मध्ये विलेपार्ले येथे राहणाऱ्या गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची दोन अनोळखी व्यक्तींनी भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गुरू हा एकेकाळी पोलीस खबरी होता अशी माहिती सूत्रांनी दिली असून त्याच्यावर विलेपार्ले आणि मुलुंड पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी देणे आणि मारामारीचे ४ ते ५ गुन्हे दाखल होते अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून गुरूच्या मृतदेहासोबत रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असलेल्या स्पा मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीसह चार जणांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. (Murder)
गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे (५०) असे हत्या करण्यात आलेल्या संशयित पोलीस खबरीचे नाव आहे. विलेपार्ले येथे राहणारा गुरू वाघमारे याचा १७ जुलै रोजी वाढदिवस होता, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा वाढदिवस १७ जुलै रोजी साजरा केला होता. गुरू याचे वरळीतील वरळी नाका येथे असलेल्या ‘स्वाॅफ्ट टच स्पा’ या स्पा मध्ये येणे जाणे असल्यामुळे स्पा मध्ये कर्मचारी त्याच्या ओळखीचे झाले होते. गुरूने आपल्याला पार्टी द्यावी म्हणून स्पा कर्मचारी यांनी त्याच्याकडे पार्टीची मागणी केली होती, गुरूने मंगळवारी पार्टी देण्याचे ठरवले. मंगळवारी रात्री आठ वाजता स्पा मधील तीन कर्मचारी आणि २१ वर्षाची तरुणी आणि गुरू अशा पाच जणांनी सायन येथील एका हॉटेलमध्ये पार्टी केली, त्यानंतर रात्री १२:३० वाजता पाचही जण पुन्हा वरळी येथे स्पा वर आले व स्पा मध्ये थांबण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. (Murder)
(हेही वाचा – Parliament Session : महाविकास आघाडीची एकजुटता फक्त दिखावा? संसदेत फुटला फुगा)
पाच जणांपैकी तिघे जण थोड्यावेळात येतो असे सांगून गुरू आणि २१ वर्षीय तरुणीला स्पा मध्ये सोडून स्पा मधून बाहेर पडले. हे तिघे बाहेर पडल्याच्या १० मिनिटांनी दोन अनोळखी व्यक्ती स्पा मध्ये आल्या आणि दोघांनी सोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी गुरू यांच्यावर सपासप वार करून पळ काढला. या हल्ल्यात गुरू याचा मृत्यू झाला. या घटनेवेळी २१ वर्षीय तरुणी ही गुरू वाघमारे सोबतच होती. बारा तासांनी या घटनेची माहिती वरळी पोलिसांना मिळाली, वरळी पोलिसांनी बुधवारी दुपारी २ वाजता घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नसून पोलिसांनी गुरू सोबत असलेल्या तरुणीसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. (Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community