Murder By Maulana : मौलानाने दुकानात पुरला अल्पवयीन मुलाचा मृतदेह; अल्पवयीन मुलांवर करीत होता लैगिंक अत्याचार

554
Murder By Maulana : मौलानाने दुकानात पुरला अल्पवयीन मुलाचा मृतदेह; अल्पवयीन मुलांवर करीत होता लैगिंक अत्याचार
Murder By Maulana : मौलानाने दुकानात पुरला अल्पवयीन मुलाचा मृतदेह; अल्पवयीन मुलांवर करीत होता लैगिंक अत्याचार

पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १६ वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने उत्तराखंड (Uttarakhand) येथून एका इस्लामिक धर्मगुरू मौलवीला अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलावर केलेल्या लैगिंग अत्याचाराचा गुन्हा लपविण्यासाठी मौलवीने पाच वर्षांपूर्वी एका १६ वर्षाच्या मुलाची हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून हे मानवी तुकडे त्याच्या दुकानात पुरले होते. हा प्रकार भिवंडी (Bhiwandi) शहरात पाच वर्षांपूर्वी घडला होता, बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत असताना ठाणे गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून या गुन्हाचा छडा लावून इस्लामिक धर्मगुरू असलेल्या मौलवीला उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातून अटक केली आहे. फॉरेन्सिक विभागाने ठाणे पोलिसाच्या मदतीने मृतदेह पुरला तेथून काही मानवी हाडे जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेण्यात आली आहे.

भिवंडी (Bhiwandi) शहरातील नेहरू नगर नवी बस्ती परिसरातून १६ वर्षाचा शोएब रशीद शेख (Shoaib Rasheed Sheikh) हा मुलगा २० नोव्हेंबर २०२० रोजी अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मुलाचा शोध घेऊन देखील मुलाचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलला या मुलाचे बरेवाईट झाले असल्याची कुणकुण लागली होती, गुन्हे शाखेकडून पुरावा आणि माहिती घेत असताना त्याच परिसरात राहणारा इस्लामिक धर्मगुरू मौलवी गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख हा मागील काही वर्षांपासून परिसर अचानक सोडून गेला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली, गुलाब उर्फ गुलाम या मौलवीने एक अल्पवयीन मुलावर लैगिंग अत्याचार केला होता, आणि हा प्रकार बेपत्ता असलेल्या शोएबने बघितला होता अशी माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली. तसेच मौलवी याच्याविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्सोचा एक गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, तेव्हा पासून हा मौलवी परिसरात दिसून आला नाही. (Murder By Maulana)

(हेही वाचा – मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई; Jagan Mohan Reddy ची 800 कोटींची मालमत्ता जप्त)

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मौलवी गुलाब उर्फ गुलाम याची माहिती काढून त्याचा शोध सुरू केला, असता मौलवी गुलाब उर्फ गुलाम शेख हा उत्तराखंड (Uttarakhand) येथील एका गावात नाव बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक उत्तराखंड येथे रवाना झाले आणि त्यांनी मौलवी गुलाब याच्या मुसक्या आवळून ठाण्यात आणले. मौलवीला प्रथम पोक्सोच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने बेपत्ता असलेल्या शोएबच्या हत्येची कबुली दिली. शोएब याने मौलवीला एका मुलावर लैगिंग अत्याचार करताना बघितले होते, शोएब हा बोंबाबोंब करेल आणि त्याला अटक होईल या भीतीने मौलवीने २० नोव्हेंबर २०२० रोजी शोएबला लालच देऊन भिवंडी येथे असणाऱ्या त्याच्या किराणा दुकानात बोलावून घेतले, दुकानातच त्याने शोएबची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून मृतसदेह दुकानाच्या बाजूला असलेल्या गाळ्यात मृतदेहाचे तुकडे पुरले व त्याच्यावर टाईल्स लावून त्या ठिकाणी बाथरूम तयार केले अशी कबुली मौलवीने पोलिसांना दिली. (Murder By Maulana)

पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून मोलवीने सांगितलेल्या जागेवर खोदकाम करून फॉरेन्सिक विभागाने ठाणे पोलिसाच्या मदतीने मृतदेह पुरला तेथून काही मानवी हाडे जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेण्यात आली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून इस्लामिक धर्मगुरू मौलवी गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे. (Murder By Maulana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.