Murder : एकतर्फी प्रेमातून दिल्ली पुन्हा हादरली; तरुणाने केला तरुणीवर चाकू हल्ला

दिल्ली मधील बेगमपूर येथे एका सनकी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा (Murder) कापला. त्यानंतर त्याने स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे.

229
Murder : एकतर्फी प्रेमातून दिल्ली पुन्हा हादरली; तरुणाने केला तरुणीवर चाकू हल्ला

सध्या देशात लव्ह जिहाद, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांची (Murder) संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशातच आता पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केला. दिल्लीतील साक्षी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : हळूहळू स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता; नागरिकांकडून १४० पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांचं समर्पण)

माहितीनुसार, दिल्ली मधील बेगमपूर येथे एका सनकी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा (Murder) कापला. त्यानंतर त्याने स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे. या विक्षिप्त तरुणाने यापूर्वीही तरुणीला प्रपोज केलं होतं, पण तरुणीने त्याला नकार दिला होता.

हेही पहा – 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला (Murder) करत तिचा गळा कापला; आणि त्यानंतर त्याने स्वत:ला देखील संपवलं. या घटनेची माहिती मिळताच गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तरुणाला वाचवता आलेलं नाही. आरोपीचं नाव अमित आहे. अमित आणि तरुणी हे दोघेही रोहिणी सेक्टर 24 मध्ये असलेल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होते. ही कंपनी अमितच्या मोठ्या बहिणीची असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीत काम करत असतानाच अमितची तरुणीशी ओळख झाल्याचं बोललं जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.