Musafir Khana येथे आर्थिक वादातून फेरी विक्रेत्यांवर गोळीबार

अस्लम शेख हा फुथपाथवर झोपलेला असताना पहाटे अडीचच्या सुमारास जोसेफ त्या ठिकाणी आला व त्याने अस्लमला शिव्या देण्यास सुरुवात केली, व अस्लमच्या दिशेने छरेची पिस्तुल मधून गोळीबार केला. त्यातील एक छरा अस्लमच्या उजव्या खांद्याला लागला.

205
Firing : पॅरोल बाहेर आलेल्या गुंडाकडून एकावर गोळीबार

क्रॉफर्ड मार्केट येथे फेरीचा व्यवसाय करणाऱ्या दोन विक्रेत्यामध्ये (Musafir Khana) झालेल्या आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी (८ मार्च) पहाटे घडली. या गोळीबारात एक जण किरकोळ जखमी झाला असून पळून गेलेल्या हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हल्लेखोर हॅरी उर्फ हरिशन जोसेफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी स्थान देऊन कार्यक्रमाचे ‘मैत्र जीवांचे’ नाव सार्थ ठरवले)

नेमका प्रकार काय ?

अस्लम शेख असे जखमीचे नाव आहे. अस्लम शेख हा मुसाफिर खाना (Musafir Khana) क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी राहण्यास आहे. हल्लेखोर हॅरी उर्फ हरिशन जोसेफ आणि अस्लम शेख हे दोघे मुसाफिरखाना, हॉटेल गुलशन येथे रस्त्यावर बॅग विक्रीचा व्यवसाय करतात. या दोघांमध्ये मागील काही महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. गुरुवारी रात्री बॅग विक्रीचा धंदा बंद केल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाला, हॅरी उर्फ हरिशन जोसेफ हा रागारागाने तेथून निघून गेला.

अस्लमने हॅरीला हातात पिस्तुल घेऊन बघताच आरडाओरडा केला…

त्यानंतर अस्लम शेख हा फुथपाथवर (Musafir Khana) झोपलेला असताना पहाटे अडीचच्या सुमारास जोसेफ त्या ठिकाणी आला व त्याने अस्लमला शिव्या देण्यास सुरुवात केली, व अस्लमच्या दिशेने छरेची पिस्तुल मधून गोळीबार केला. त्यातील एक छरा अस्लमच्या उजव्या खांद्याला लागला, झोपेतून जागा झालेल्या अस्लमने हॅरीला हातात पिस्तुल घेऊन बघताच आरडाओरडा केला असता फुटपाथवर झोपलेले इतर फेरीवाले उठून बसले व त्यांनी हॅरीला पकडण्याचा प्रयत्न केला असता हॅरी हा सोबत असलेल्या दोन सहकाऱ्यासह मोटारसायकल बसून पळून गेला. (Musafir Khana)

(हेही वाचा – Women : रेल्वे संरक्षण दलात महिला कर्मचाऱ्यांचे किती आहे प्रमाण? जाणून घ्या)

या गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या अस्लम याला सेंट जॉर्ज रुग्णालयात आणून उपचार करून सोडून देण्यात आले. या गोळीबाराची माहिती मिळताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.(Musafir Khana)

धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल :

पोलिसांनी हॅरी उर्फ हरिशन जोसेफ विरुद्ध हत्येचा प्रयत्न, धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी हॅरीचा शोध सुरू आहे. (Musafir Khana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.