धक्कादायक! दिल्लीत मुसलमान तरूणाने हिंदू मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक

128

दिल्लीतील नंद नगरी भागात सोमवारी रात्री कासिम नावाच्या मुसलमान मुलाने एका हिंदू तरूणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुणी दुसऱ्या मुलासोबत फोनवर बोलत असल्याने आरोपी कासिमने गोळ्या झाडून घटनास्थळावरून पलायन केले.

( हेही वाचा : “बुरा न मानो होली है”…देशभरात धुळवडीचा उत्साह, पहा क्षणचित्रे)

या मुलीला जखमी अवस्थेत जीटीबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलीच्या खांद्याला गोळी लागून गंभीर इजा झालेली आहे. याप्रकरणी दिल्लीतील नंद नगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय ? 

पीडित तरूणी तिच्या आईसोबत नंग नगरी परिसरात राहत असून तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. तिची आई घरगुती मदतनीस आहे. सोमवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित मुलगी यावेळी घरी होती, त्यांच्या शेजारी राहणारा कासिम त्यांच्या घरी आला या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून मैत्री होती. आरोपी घरी आल्यावर “मी असताना तू कोणत्याही तरुणाशी मैत्री करू शकत नाही” असे म्हणाला. यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला, कासिमने पीडित तरुणीचा मोबाइल चेक केला यामध्ये अनोळखी क्रमांक त्याला दिसला यानंतर संतप्त होऊन त्याने मुलीच्या खांद्यावर गोळी झाली.

जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

गोळी लागल्यावर पीडित मुलगी खाली कोसळली आणि आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. शेजारी राहणाऱ्यांना माहिती मिळाल्यावर जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.  याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.