ठाण्यातील मुंब्रा शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली येथे राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निकाह लावण्यात आला आहे. या बालविवाहाची (Muslim Child Marriage) जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यानी गंभीर दखल घेतली असून निकाह (Nikah) लावून देणाऱ्या मौलाना आणि मुलीच्या आईसह १२ जणांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या वडिलांनी हा प्रकार महिला बाल विकास विभागाच्या (Department of Women and Child Development) लक्षात आणून दिल्यानंतर या घटनेची दखल घेण्यात आली आहे. (Muslim Child Marriage)
पुण्यातील हवेली येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यांत असलेल्या कौटुंबिक वादातून हे दाम्पत्य वेगळे राहत आहे. तक्रारदार यांना दोन मुले आहे. एक १६ वर्षाचा मुलगा आणि १३ वर्षाची मुलगी आहे. हे दोन्ही मुले आईसोबत सोलापूर येथे राहतात. या दांपत्यात अद्याप तलाक झालेला नसून तक्रारदार यांनी मुलाचा सांभाळ करण्यासाठी मुलाचा पत्नीकडे ताबा मागितला. परंतु पत्नीने ताबा देण्यास नकार दिला होता. दरम्यान, तक्रारदार यांची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या १३ वर्षीय मुलीचा विवाह मुंब्रा येथील २५ वर्षीय मुलासोबत ठरवला असून ९ ऑगस्ट रोजी हे लग्न होणार असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली.
मुलगी अल्पवयीन (minor girl) असल्यामुळे हा निकाह रोखण्यासाठी तक्रारदार हे मुंब्रा येथे आले, परंतु पत्नी आणि सासरच्या मंडळींनी एक दिवस आधीच मुलीचा निकाह उरकून टाकला होता. दरम्यान, तक्रारदार यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी (Department of Women and Child Development, Thane) ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला. महिला बाल विकास अधिकारी यांनी तक्रारदार यांना ठाणे येथील कार्यालयात बोलवून मुलीचे सर्व कागदपत्रे तपासून या निकाहची दखल घेण्यात आली. दरम्यान तक्रारदार यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले.
तक्रारदार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी तक्रारदार यांना बोलावून त्याची तक्रार दाखल करून निकाह लावून देणाऱ्या मुंब्रा येथील मौलानासह १२ जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कायदा कलम १०,११,९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. (Muslim Child Marriage)
हेही पाहा –