पुणे येथून मुंबईला दररोज अप-डाऊन करणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका मुसलमान प्रवाशाला प्रवाशांनी रंगेहात पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोहम्मद अश्रफ असे त्या मुसलमानाचे नाव आहे.
पोक्सो कायद्यानुसार कारवाई
अश्रफ हा ट्रेनमधील महिलांचे, अल्पवयीन मुलींचे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करुन छेड काढणाऱ्या व्यक्तीला प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तसेच या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देखील दिले. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे बुधवारी, ५ मार्च रोजी हा व्यक्ती काही महिलांचे व्हिडिओ काढत त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपीचे नाव मोहम्मद अश्रफ असून तो बिहारमधील सितामढीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने असे का केले, याची माहिती घेत आहेत. त्याच्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. दोन दिवसापूर्वी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कोठडीत एक महिलेचा मृत्यू झाला होता. त्याबाबत देखील चौकशी सुरू असून पोलिसांमसोर वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community