वक्फ सुधारणा कायद्याच्या (Waqf Amendment Bill) विरोधात गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसलमानांकडून आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बंगालमधील (Bengal) मुर्शिदाबाद (Murshidabad) येथे शुक्रवार, ११ एप्रिल या दिवशी दुपारच्या नमाजापठणानंतर मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी हिंसाचार केला. शनिवार, १२ एप्रिललाही हा हिंसाचार सुरुच होता. २४ तासांनंतरही त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले नाही. (West Bengal Waqf Law Violence)
(हेही वाचा – कोठडीत Tahawwur Rana अदा करतो ५ वेळा नमाज; कुराण आणि पेन देण्याची प्रशासनाकडे मागणी)
१३ एप्रिल या दिवशी धर्मांध मुसलमानांनी येथील जाफराबाद भागात एका हिंदु पिता आणि त्यांचा पुत्र यांची हत्या केली. हरगोविंद दास आणि चंदन दास अशी त्यांची नावे आहेत. ते हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत होते. ३ दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हिंसाचार केला होता. त्यांनी पोलिसांवर आक्रमण करून अनेक गाड्यांची जाळपोळ केली होती. त्यानंतर पुन्हा तशीच घटना घडली. या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११५ मुसलमानांना अटक केली आहे.
शुक्रवार, दुपारी १२ ते १ च्या सुमारास मुर्शिदाबादमधील जंगीपूर आणि सुती भागांत मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग-१२ (National Highway-12) वर सरकारी बसगाड्या आणि अन्य वाहने यांची जाळपोळ केली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी एका मशिदीत जाऊन आश्रय घ्यावा लागला. पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांना पळवून लावण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. पश्चिम रेल्वेने दुपारी २.४६ वाजता अझीमगंज-न्यू फरक्का विभागात धुलियानगंगा स्थानकाजवळ सुमारे ५ हजार मुसलमानांनी रेल्वेरुळ अडवल्याची माहिती दिली होती.
मुर्शिदाबादपासून १० कि.मी. अंतरावरील शमशेर गंज (Shamsher Ganj) येथे सहस्रो धर्मांध मुसलमानांनी जाळपोळ केली. येथील सरकारी विश्रामगृहाची तोडफोड करून त्याला आग लावली. धुलियान रेल्वे स्थानकावर आक्रमण करून तेथील साहित्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच येथे पोलिसांवर गावठी बाँबही फोडण्यात आला.
मुर्शिदाबाद येथे इंटरनेट बंद करण्यात आले आहे. या हिंसाचारात अनेक पोलीस घायाळ झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांचे साहाय्य घेतले जात आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी या हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यपाल बोस यांनी राज्य सरकारला मुर्शिदाबाद, मालदा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांतील संवेदनशील भागांत झालेल्या अशांततेसाठी उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (West Bengal Waqf Law Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community